आत्ताच्या घडामोडी

त्या एका चुकीमुळे सुनील शेट्टीचे करियर झाले बर्बाद! अन्यथा खूप उंचीवर असता…

मुंबई | हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक बडे कलाकार येऊन गेले आणि काही यशस्वी देखील झाले आहेत. सलमान खान, शाहरुख खान यांच्या सारखे स्टार आज बॉलिवूड वर राज्य करताना पाहायला मिळत आहेत.

 

मात्र काही वर्षांपूर्वी सलमान खानला टक्कर देत असलेला अभिनेता सुनील शेट्टी उंच शिखरावर जाऊन पोहचला नाही. सुनील शेट्टीने सुरुवातीच्या काळात छोट्या पडद्यावर काम केले. त्यानंतर त्याला 1992 साली बॉलिवूड मध्ये काम करण्याची संधी मिळाली.

 

1992 मध्ये बलवान या चित्रपटात त्याने काम केलं. त्या चित्रपटाने तो अत्यंत प्रसिध्द झाला. त्यानंतर त्याला अनेक चित्रपट मिळाले. त्याने शेकडो चित्रपटात काम केले. बड्या अभिनेत्यांना तो टक्कर देऊ लागला.

 

त्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात लोकप्रिय म्हणजेच धडकन या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो चित्रपट एवढा चालला की याने सर्वच पात्रांचे आयुष्य बदलून गेलं.

 

माञ धडकन या चित्रपटानंतर सुनील शेट्टी परत कधीच बड्या चित्रपटात झळकला नाही. याच कारण म्हणजे त्याने केलेल्या महत्वाच्या दोन चुका, सुनील शेट्टी बॉलिवूड मधील सर्वात मोठा उद्योगपती म्हणून ओळखला जातो.

 

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या जोडीतील हा अभिनेता उंच शिखरावर का जाऊ शकला नाही. याचं उत्तर खुद्द त्याने म्हणजेच सुनील शेट्टी याने एका मुलाखतीत दिले आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तो आला होता, त्यावेळी त्याने या प्रश्नाचं उत्तर दिले आहे.

 

तो म्हणाला मी दोन मोठ्या चुका केल्या आहेत. त्यातील एक चूक म्हणजे मी स्वतःची जाहिरात करण्यास कमी पडलो, आणि चित्रपटाची पूर्ण स्टोरी न वाचता मी चित्रपट साईन केले. अशा दोन प्रमुख चुका केल्याचे त्याने कबूल केले आहे.

 

धडकण या चित्रपटाच्या नंतर तो कोणत्याच चित्रपटात तो पुन्हा दिसला नाही. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत मोठी घट झाल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र येत्या काळात तो पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button