स्पृहा जोशीचा पती दिसतो खूप देखणा; करतो ‘हे’ काम

मुंबई | स्पृहा जोशी ही मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आजवर या सिनेसृष्टीतील अनेक हिट चित्रपट घडवले आहेत. अशात नुकतेच तिने आपल्या पती बरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटमधून हार्ट ईमोजीचा वर्षाव केला आहे. साल २०१४ मध्ये तिने वरध लघाटे बरोबर लग्न केलं. लग्ना आधी एकूण सहा वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या नात्याला पती पत्नीच नाव दिलं.

 

वरदचा आणि अभिनयाचा दूर दूर पर्यंत काहीच संबंध नाही. त्याने आपलं करिअर पत्रकारितेत सुरू केलं. मात्र सध्या तो हे क्षेत्र सोडून मार्केटिंग कडे वळला आहे. साल २००८ मध्ये हे दिघे रिलेशनशिपमध्ये आले होते.

 

स्पृहाने आता पर्यंत उंच माझा झोका, आभाळमाया, अग्निहोत्री, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, दे धमाल, सुपरस्टार, सत्यमेव जयते अशा अनेक मालिका आणि शो मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

 

ती सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करते. सध्या तिने आपल्या पती बरोबर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती चांगलीच चर्चेत आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button