आत्ताच्या घडामोडी

चिंताजनक! अभिनेता विक्रम रुग्णालयात दाखल; अचानक प्रकृती खालावली….

दिल्ली | अभिनय क्षेत्रातून एक सिंताजनक बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिनाय विक्रम याच्या छातीत दुखू लागले आहे. त्याला हा त्रास होत असल्याचे समजताच त्याला चेन्नईमधील कावेरी रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत.

 

चीयान विषयी अशी बातमी समोर येताच त्याचे चाहते त्याच्या तब्येतीची काळजी करत आहेत. तसेच अनेक जण सोशल मीडियावर त्याच्या विषयी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. अनेक जण आपल्या पोस्टमधून तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहेत. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यापासून आता सोशल मीडियावर त्याच्या विषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत.

 

कोणी म्हणत आहे की, त्याला हृदय विकाराचा झटका आला. तर कुणी सांगत आहेत की, गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्याला ताप येत होता. या सर्व बातम्या किंवा अशी माहिती ही एक अफवा आहे. अशा बातम्यांमुळे मध्यामांवरचा विश्वास उडत चालला असल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टरांशी आम्ही बातचीत केली असता त्यांनी या सर्व बातम्या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले.

 

आता चिनाय विक्रमवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे असं डॉक्टर म्हणले. तसेच त्यांनी आणि अभिनेत्याच्या चाहत्यांनी सांगितले आहे की, कृपया त्याच्या विषयी कितीही अफवा पसरवू नका.

 

अभिनेता लवकरच मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेलवन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी त्याचे शुटींग सुरू आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विक्रम त्याच्या आय या चित्रपटातून खूप चर्चेत आला होता. यातील त्याचा अभिनय खरोखर कौतुकास्पद होता. अशात आता चाहते तो लवकर ठीक व्हावा आणि त्याचा आगामी चित्रपट पाहता यावा अशी प्रार्थना करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button