आत्ताच्या घडामोडी

सोनाक्षी सिन्हाने होणाऱ्या पतीचे नाव सांगितले; लवकरच होणार सलमान खानच्या घरची सून

दिल्ली | बॉलिवूडचा भाईजान अजूनही सिंगल आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अजूनही त्याच्या आयुष्यात ती सुंदर परी आलेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बरोबर त्याच नाव जोडलं जातं आहे. तर आता या विषयी अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला आहे.

 

सोनाक्षी सिन्हा हे बॉलिवूडमधील असं एक नाव आहे ज्याची कोणती विशेष ओळख करून देण्याची गरज नाही. दबंग, लुटेरा, तेवर, कलंक अशा अनेक चित्रपटांतून सोनाक्षीने बॉलिवूडवर स्वतः ची एक वेगळी छाप उमटवली आहे.

 

काही दिवसांपूर्वी तिने कोणालाही न सांगता गपचुप पद्धतीने आपला साखरपुडा उरकला. त्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडे तिचीच चर्चा रंगली. तिने असं का केलं? तिला घरातून विरोध होता का? तिने कुणाही साखरपुडा केला? तिचा होणारा पती कोण आहे? अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं. आणि यातील प्रत्येक प्रश्नात सलमान खान हे नाव पाहायला मिळालं.

 

सोनाक्षी ही एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा देखील बॉलिवूडवर एक वेगळा वचक आहे. मात्र तरी देखील तिला सिनेसृष्टीत पहिल्यांदा सलमान खानचं घेऊन आला. बॉलिवूडच्या भाईजानने त्याच्या ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल टाकण्यासाठी मदत केली.

 

तिच्या या पहिल्याच चित्रपटाने ती चांगलीच प्रकाश झोतात आली. अशात आता सोनाक्षीने सलमान खान बरोबर आपलं नात जोडलं आहे. आणि तिने स्वतः या नात्याची कबुली देखील दिली आहे. लवकरच ती त्याच्या कुटुंबाची एक सदस्य होणार आहे. आणि लवकरच लग्न देखील करणार आहे.

 

चाहत्यांच्या मनात असलेले प्रश्न सोडवण्यासाठी तिने या गोष्टीचा खुलासा केला असून आता ती आणि सलमान खान दोघेही खूप खुश आहेत. तिने आपल्या होणाऱ्या पतीचं नाव जाहीर केलं आहे. तिच्या होणाऱ्या पतीचं नाव इक्बाल जहीर असं आहे. सलमान खान इक्बालला आपला मोठा भाऊ मानतो.

 

म्हणजे सोनाक्षी सलमानच्या घरची सदस्य होणार आहे. तिने त्याच्याशी नातं जोडलं आहे पण ते पती पत्नीचं नाही तर वहिनी आणि दिराचं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button