Video – सासरी जाताना आख्ख्या गावाला रडवून गेली नवरी ताई; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न हे खूप मोठं कार्य समजलं जातं. लग्न हे जरी दोन व्यक्तींमध्ये होत असलं तरी यासाठी दोन्ही कुटुंब आपली जमापुंजी लग्नात खर्च करतात.

 

यात विशेष म्हणजे नवरी मुलगी आणि तिच्या घरच्यांसाठी हा जेवढा आनंदाचा प्रसंग असतो तेवढाच दुःखाचा देखील.

 

कन्या दान हे सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं जातं. अशात पूर्वीच्या काळी हुंडा प्रथा सुरू होती. जी काही काळाने बंद झाली. हुंड्या बरोबरच लग्नाचा सर्व खर्च मुलीच्या माणसांना करावा लागायचा.

 

मात्र आता जग बदलत चाललं आहे. मुलगा मुलगी दोघेही सुशिक्षित झाले आहेत. आज काल लग्नात होणारा खर्च मुलगा आणि मुलगी या दोन्ही मंडळींनी आर्धा आर्धा द्यायचा असं सुरू आहे.

 

लग्नात प्रि वेडिंग शूट, डिजे, मेहंदी असे अनेक कार्यक्रम होत असतात. अगदी साखरपुड्यापासून लग्न घरात धामधून सुरू होते. ज्यामध्ये सर्वच जण खूप आनंदी असतात.

 

मात्र आता जग कितीही आधुनिक झालं असलं तरी, मात्र मुलीलाच लग्न झाल्यावर मुलाच्या घरी जावं लागतं. हा काळ प्रत्येक आई वडिलांसाठी खूप कठीण असतो.

 

या वेळी मुलीचे वडील आणि भाऊ खूप रडतो. आयुष्यभर बाप आपल्या मुलीचं संगोपन करतो. तिला हवं नको ते सर्व पुरवतो. अशात बाप कितीही कठोर काळजाचा असला तरी, मुलीला सासरी पाठवताना त्याच्या डोळ्यात अश्रू येतेच.

 

असाच एक लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एका मुलीची विदाई दिसते आहे. ही मुलगी खूप रडत आहे. तिच्या घरची मंडळी देखील तिला सासरी पाठवताना रडत असताना दिसत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button