अभिनय क्षेत्र हादरलं! प्रसिध्द कलाकारावर पसरला दुःखाचा डोंगर

दिल्ली | संगीत विश्वातील एक खूप मोठी आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध गायक बी प्राक याने आपल्या नवजात बाळाला गमावलं आहे. या बातमी मुळे चाहते खूप हळहळ व्यक्त करत आहेत.

 

बी प्राकने स्वतः या बाबतची माहिती दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये लिहिले आहे की, ” अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, आमच्या नवजात बाळाचे जन्मादरम्यान निधन झाले आहे.

 

पालक म्हणून आम्ही सर्वात दुःखद टप्प्यातून जात आहोत. आम्ही डॉक्टर आणि कर्मचारी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि पाठिंबा दिला. या नुकसानीमुळे आम्ही सर्वजण हादरलो आहोत आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की, कृपया आम्हाला यावेळी गोपनीयता द्या. मीरा आणि बी प्राक.”

 

बाळाच्या निधनाने तो आणि त्याचे कुटुंबीय खूप खचले आहेत. बुधवारी (१५ जून) रोजी त्याने ही पोस्ट शेअर केली होती. साल २०१९ मध्ये त्याने मिरा बच्चन बरोबर विवाह केला. त्यानंतर या दोघांना एक मुलगा झाला. त्याचं नाव अदाब असं आहे.

 

अदाब नंतर त्यांनी पुन्हा एकदा आई बाबा होण्याचा निर्णय घेतला होता. ४ एप्रिल रोजी त्याने तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे अशा कॅप्शनसह आपल्या पत्नी बरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता.

 

या फोटोमध्ये मिरा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. तसेच ते दोघेही एक मेकांच्या मिठीत समुद्र किनारी आपल्या नवीन बाळाच्या आनंदात दिसत आहेत. यावेळी दोघांनीही सफेद आणि काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला ड्रेस घातला आहे.

 

बी प्राकने आता पर्यंत बॉलिवूडसाठी देखील अनेक गाणी गायली आहेत. त्याचं किस्मत हे गाणं खूप गाजलं होतं. बाटला हाऊस, तडप, बच्चन पांडे यासह कप्तान, शेरशाह, बाला सारख्या अनेक चित्रपटांत त्याने गाणी गायली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button