आत्ताच्या घडामोडी

सिद्धार्थ जाधवच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब; पत्नीने हटवलं अभिनेत्याचं नाव

मुंबई | बॉलिवूड प्रमाणेच मराठी सिनेसष्टीतील अनेक कलाकार देखील घटस्फोट घेताना दिसत आहेत. कलाकार आणि त्यांचं खरं आयुष्य या विषयी प्रत्येक चाहत्याला जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. अशात अभिनेता सिद्धार्थ जाधव आता घटस्फोट घेणार आहे अशा अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होत्या.

 

तर यावर त्याच्या पत्नीने एक मोठं पाऊल उचलेल दिसत आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिद्धार्थ जाधव बरोबरच नाव हटवलं आहे. तिने तृप्ती जाधव हे नाव हटवलं असून तृप्ती अक्कलवार असं नाव आता लिहिलं आहे.

 

तिच्या या नावाने सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धर्थ जाधव आणि तृप्ती या दोघांमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. असं अनेक दिवसांपासून माध्यमांवर झळकत होतं.

 

या सर्व चर्चा खोट्या असाव्यात असंही काही चाहत्यांना वाटत होतं. मात्र तृप्तीने आपलं नाव बदलल्याने या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या दोघांच्या घटस्फोटाचा जो काही अंदाज बांधला जात होता तो देखील खरा ठरला आहे.

 

गेल्या दोन महिन्यांपासून या दोघांमधील वाद प्रचंड वाढले होते. त्यामुळे ते दोघे वेगवेगळे देखील राहत आहेत. मात्र अनेक असे कपल आहेत ज्यांचा घटस्फोट झाला असला तरी, आपल्या मुलांसाठी ते एकत्र येतात. असच सिद्धार्थ आणि तृप्ती या दोघांनी देखील केलं.

 

काही दिवसांपूर्वी हे दिघे आपल्या दोन मुलींबरोबर दुबई येथे फिरायला गेले होते. इथे आल्यावर सिद्धार्थने आपल्या मुलींबरोबर कॉलीटी टाईम स्पेंड केला. तसेच मज्जा मस्ती करतानाचे अनेक फोटो सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील पोस्ट केले होते.

 

मात्र या वेळी त्याने पत्नी तृप्ती बरोबर एकही फोटो पोस्ट केला नव्हता. यावरून सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं. तसेच तृप्तीने देखील आपल्या मुलींबोबर फोटो शेअर केले होते. यामध्ये सिद्धार्थ कुठेच दिसत नव्हता.

 

सिद्धार्थ आणि तृप्ती या दोघांनी साल २००७ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असायची. चाहत्यांना त्यांची लवस्टोरी खूप आवडायची. मात्र आता त्याचा घटस्फोट होणार असल्याने चाहते देखील नाराज आहेत. अभिनेता लवकरच आपल्याला दे धक्का २ या चित्रपटात दिसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button