सिद्धार्थ जाधवच्या सुखी संसाराला लागली कुणाची नजर; घटस्फोटाची माहिती झाली व्हायरल

मुंबई | बॉलिवूड प्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कपल विभक्त होतं असल्याच्या अनेक बातम्या कानावर येत आहेत. अशात सगळ सुरळीत असताना मध्येच माशी कुठे शिंकते असा प्रश्न अनेक चाहत्यांना सतावतो. तर मराठी सिनेसृष्टीतील आणखीन एक अशीच बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला देखील नक्कीच धक्का बसेल.

 

घटस्फोटाच्या यादीत आता लवकरच मराठीतील प्रसिद्ध विनोदी चमकता तारा म्हणून ओळखला जाणारा सिध्दार्थ जाधव देखील येणार आहे. त्याच आणि त्याच्या पत्नीचं गेल्या दोन वर्षांपासून भांडण सुरू आहे अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

 

१० मे २००७ रोजी सिध्दार्थने तृप्ती अक्कलवार बरोबर विवाह केला. या दोघांना दोन मुली देखील आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांमध्ये भांडण होतं असल्याची चर्चा जोर धरत आहे. तसेच हे दोघे आता एकत्र राहत नाही. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. तसेच त्या दोघांच्या मुली या तृप्ती बरोबर राहत आहेत.

Advertisement

 

नुकताच सिध्दार्थ आपल्या कुटुंबाला घेऊन दुबई येथे सुट्या एन्जॉय करताना दिसला. दुबईमधील अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो आपल्या मुलींबरोबर खूप मज्जा मस्ती करताना दिसला. मात्र त्याने आपल्या पत्नी बरोबर एकही फोटो पोस्ट केलेला नाही. तृप्तीचं सोशल मीडिया अकाऊंट चेक केलं असता आम्हाला समजलं की, तिने देखील सिद्धार्थ बरोबर एकही फोटो पोस्ट केलेला नाही.

 

यावरून समजते की, हे दोघे वेगळे झाले आहेत आणि आपल्या मुलींसाठी ते एकत्र येत आहेत. अनेक कपल आपल्या मुलांसाठी एकत्र डिनरला आणि बाहेर फिरायला जात असतात. तसेच हे दोघे देखील गेले असतील असं म्हटलं जातं आहे.

 

मात्र आपल्या नात्याबद्दल सिद्धार्थ आणि तृप्ती या दोघांनी देखील अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ही माहिती खरी की खोटी हे समोरील काळचं स्पष्ट करू शकेल. सिद्धार्थ आणि तृप्ती या दोघांचा घटस्फोट झाला असल्यास त्याच्या चाहत्यांसाठी ही खूप दुःखद बाब ठरणार आहे.

 

सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याच्या दमदार अभिनयाने त्याने आजवर लाखोंचा चाहता वर्ग स्वतः कडे खेचून घेतला आहे. लवकरच तो दे धक्का २ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *