आत्ताच्या घडामोडी

रविवारी सुट्टी मागीतल्यामुळे प्रसिध्द अभिनेत्रीला मालिकेतून टाकलं काढून; अन् पुढे जे घडलं…

मुंबई | रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असतो. नोकरदार हा दिवस विशेष साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत, दररोजच्या ताण तणावामुळे हा दिवस खास करण्याची इच्छा अनेकांची असते. रविवारी विषेश प्रकारची मेजवानी तसेच अनेक जण पर्यटनासाठी देखील जातात.

 

या दिवशी काहीजण आपल्या परिवारासोबत चांगला घालविण्याचा प्रयत्न करतात. रविवारी कोणाला सुट्टी नको आहे. या दिवशी प्रत्येकाला सुट्टी हवी असते. मात्र या दिवशी सुट्टी मागितल्यामुळे एका लोकप्रिय अभिनेत्रीला मालिकेतून काढलं असल्याचा प्रकार घडला आहे.

 

लोकप्रिय अभिनेत्री शुभवी चोक्सी हिला निर्मात्याने मालिके मधून थेट बाहेरचा रस्ता दाखविला आहे. तिने मुलाची काळजी घेण्यासाठी रविवारी सुट्टी मागितली होती. त्यानंतर तिला मालिकेच्या सेट वरून काढून टाकण्यात आले.

 

एका मुलाखतीच्या दरम्यान तिच्या सोबत घडलेला किस्सा तिने सांगितला आहे. तसेच कलाकारांना रविवारी सुट्टी देण्याची मागणी तिने केली आहे. कसोटी जिंदगी की, बडे अच्छे लगते हैं, कहाणी घर घर की, धडक

जस्सी जैसी कोई नहीं, तीन बहुरानिया या सारख्या दिग्गज मालिकांमध्ये शुभवी ही मुख्य भूमिकेत दिसली होती. तिचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. ती कायम सोशल मीडियावर बऱ्या प्रमाणात सक्रिय दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button