चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुख खानचा जबरदस्त कमबॅक; एक दोन नाही तर तब्बल ५ चित्रपटांमध्ये झळकणार किंग खान

दिल्ली | बॉलिवूडचा किंग खान गेल्या चार वर्षांपासून बॉलिवूड पासून दूर आहे. अशात साल २०१८ मध्ये आलेला चित्रपट झिरोमध्ये तो शेवटचा दिसला होता. अशात आता लवकरच तो अनेक चित्रपटांमधून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या बातमीमधून त्याच्या आगामी चित्रपटांविषयी जाणून घेऊ.

 

• ब्रह्मास्त्र –
आलिया भट आणि रणबीर कपूर अभिनित ब्रह्मास्त्र या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात काही दिवसांपूर्वी त्यांच्या या चित्रपटाचा एक टिजर व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. टिजर पाहून अनेक जण या चित्रपटामध्ये शाहरुख देखील आहे असं म्हणत आहेत. अशात गूगलवरील या चित्रपटाच्या कास्ट लिस्टमध्ये देखील शाहरुखचं नाव आहे. ब्रह्मास्त्रमध्ये शाहरुख वैज्ञानिकांच्या भूमिकेत दिसेल. तसेच हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

• पठाण –
पठाण हा एक ॲक्शन आणि थ्रिलरने भरलेला चित्रपट आहे. याचं चित्रपटातून शाहरुखचा ग्रँड कमबॅक होणार आहे. चित्रपटात त्याच्यबरोबर अभिनेता जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य पात्र साकारणार आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

 

• जवान –
शाहरुख खानचा जवान हा चित्रपट देखील पुढल्याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याचा काळजात धडकी भरवणारा अंदाज पाहायला मिळेल. या चित्रपटाचा देखील एक टिजर व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात शाहरुख खान बरोबर अभिनेत्री नयनतारा स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होतोय. एटली कुमार यांच्या निदर्शनात हा चित्रपट तयार होत आहे. कन्नड, तमिळ तेलुगू सह मल्याळम भाषेतही हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

 

डंकी –
साल २०२३ देखील शाहरुख खानच्याच चित्रपटांनीच संपणार आहे आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटात विकी कौशल आणि तापसी देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. राजकुमार हिरानी हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

 

• टायगर ३ –
मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर ३ ची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. टायगर या चित्रपटात कटरीना आणि सलमान या दोघांनी दमदार अभिनय केला. तर आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात शाहरुख खान देखील दिसणार आहे. तो यामध्ये केमिओ आहे. हा चित्रपट देखील सुपर सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शनने सज्ज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button