आत्ताच्या घडामोडी

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी अत्यंत दुःखत बातमी

दिल्ली | कोरोना महामरिने आता पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाची ही चौथी लाट असल्याने प्रशासन अधिक खबरदारीचा इशारा देत आहे. काही नियम देखील पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहेत.

 

अशात सध्या बॉलिवूड कोरोनाच्या निशाण्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि या कलाकारांच्या यादीत आता किंग खानचं नाव देखील शामील झालं आहे.

 

बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना अहवाल हा सकारात्मक आला आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आणखीनच चिंतेची लाट पसरली आहे.

 

• करण जोहरच्या पार्टीने दिलं कोरोनाला आमंत्रण – बॉलिवूडमधील एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने आपल्या ५० व्या वाढदिवसानिमत्त एक मोठी बडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आमंत्रित केलं होतं.

 

अंधेरी येथील यश राज फिल्म स्टुडिओमध्ये या जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी करीना कपूर, सलमान खान, शाहरुख खान, कीयारा अडवाणी, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर अशी एकूण ५० ते ५५ कलाकार मंडळी आली होती.

 

पार्टीमध्ये या सर्वांनी केलेली मज्जा यातील बऱ्याच जणांच्या अंगाशी आली. बॉलिवूडमधिल अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, कतरीना कैफ आणि आता शाहरुख खान हे सध्या कॉरंटाईन आहेत.

 

किंग खान या पार्टीमध्ये त्याच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्री बरोबर आला होता. त्यामुळे आता या पार्टीत आलेल्या अनेक मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र अद्याप बऱ्याच व्यक्तींनी याचा उघडपणे खुलासा केलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button