आत्ताच्या घडामोडी

बॉलिवूडच्या किंग खानने केला होता मोठा काळाबाजार; जेलचीही हवा खावी लागली

दिल्ली | बॉलिवूडचा किंग खान म्हणून आजही शाहरुख खान चं नाव घेतलं जातं. त्याने आपल्या आयुष्यात यशाचं शिखर खूप मेहनतीनं मिळावं आहे. त्याच्या जीवनाशी निगडित अनेक स्ट्रगल लाईफच्या स्टोरी तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असतील आणि वाचल्या असतील.

 

आता बॉलिवूड हे एक असं ठिकाण आहे जिथे गॉडफादर शिवाय कोणीच टिकू शकत नाही. ज्यांना गॉडफादर नाही त्यांचा सुशांत सिंग राजपूत प्रमाणे बळी जातो. तर आज या बातमीतून बॉलिवूडच्या किंग खानचे गॉडफादर आणि आता पर्यंत तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

असं म्हटलं जातं की, शाहरुख खान हा खूप गरीब होता. त्याच्याकडे सुरुवातीच्या काळात पुरेसे पैसे नव्हते. तर शाहरुखचे वडील दिल्लीतील अनेक हॉटेल्सचे मालक होते. तसेच शाहरुखचं प्राथमिक शिक्षण हे दिल्लीतील सेंट कोलंबा स्कूलमध्ये पूर्ण झालं, त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी हंसराज कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं.

 

तो ज्या शाळेत आणि महाविद्यालयात शिकला आहे तिथली फी खूप जास्त होती. श्रीमंत लोकांची मुलं तिथे शिकायची. मग शाहरुख गरीब होता तर त्याच्या घरच्यांना त्यांची एवढी महागडी फी भरण कसं काय परवडत होतं. अभिनेत्री अमृता सिंग तर सगळ्यांना माहीतच असेल.

 

ही अभिनेत्री किती श्रीमंत आहे हे पण अनेकांना माहीत असेल. अशात शाहरुखची बहीण अमृताची क्लासमेट होती. जर शारुख खान गरीब असता, तर त्याची बहीण एका अभिनेत्रीने जिथे शिक्षण घेतलं तिथेच तिने देखील स्वतःच शिक्षण कसं काय पूर्ण केलं असतं?

 

आता जरा शाहरुखच्या अभिनयाकडे वळू मंडळी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आजवर कोणताच कलाकार गॉड फादर शिवाय स्टार झालेला नाही. त्यामुळे शाहरुख खानच्या मागे देखील एका दिग्गज अभिनेत्याचा हात होता. या बद्दल आजवर बऱ्याच जणांना माहीत नाही.

 

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि शाहरुख खानचे वडील हे त्यांच्या तरुणपणी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. ते अनेक वेळा एकमेकांना भेटायचे. कुटुंबीयांसोबत देखील त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत.

 

दिलीप कुमार हे शाहरुखच्या वडिलांचे मित्र असल्याने शाहरुख पहिल्यांदा ‘फौजी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याच झालं असं त्यावेळी राज कुमार कपूर यांना या मालिकेत डायरेक्शनचं काम मिळालं होतं. त्यावेळी त्यांना एका तरुण मुलाची गरज होती. तेव्हा दिलीप यांनी शाहरुखचं नाव पुढे केलं होतं.

 

त्या काळी दिलीप कुमार बॉलिवूडवर आपल्या दमदार अभिनयाने राज्य करत होते. त्यांनी हे नाव सुचवलं आहे म्हटल्यावर ऑडिशन न देताच त्याचं या मालिकेसाठी सिलेक्शनही करण्यात आलं. त्यानंतर साल १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिवाना’ या चित्रपटातून तो पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. तेव्हा देखील दिलीप कुमार यांच्या मुळेच त्याला हा चित्रपट मिळाला होता.

 

त्यावेळी तो स्वतःची ओळख मी दिलीप कुमार यांचा भाचा आहे अशी सांगायचा. दिलीप कुमार शाहरुखच्या आईला बहिण मानायचे. शाहरुखने स्वतः सुरवातीच्या काळात अनेक मुलाखतींमध्ये दिलीप कुमार यांचे त्याच्या कुटुंबीयांशी असलेले संबंध सांगितलेले आहेत.

 

शाहरुख सुरुवातीला गरीब नव्हता वडीलांच्या निधनानंतर त्याच्यावर थोडे वाईट दिवस आले. शाहरुखच्या वडिलांच निधन झाल्यानंतर त्यांचे सर्व व्यवसाय ठप्प झाले. त्यावेळी नुकसान झाल्यानंतर शाहरुख शिक्षणाबरोबर रॉकेलचा काळा बाजार करत होता. अशा पद्धतीने लोकांना फावल्यामुळे त्याला देखील जेलची हवा खावी लागली होती.

 

पाकिस्तानविषयी शाहरुखच प्रेम तुम्हा सर्वांना माहीतच असेल. आयपीएलमध्ये शाहरुखची स्वतःची एक टीम आहे. एकदा शाहरुख म्हणाला होता की, “मी माझ्या टीममध्ये फक्त पाकिस्तानी खेळाडूंनाच घेणार आहे.” त्याच्या या वक्तव्यावर शिवसेना शाहरुख खानवर चांगलीच तापली होती. तेव्हा सोशल मीडिया नव्हतं पण सामना वृत्तपत्रातून शाहरुखवर खूप टीका केली गेली होती.

 

साल २०१४ मध्ये बीजेपीचं सरकार आलं. त्यावेळी ज्या देशाने त्याला एवढी मोठी प्रसिद्धी दिली त्याचं देशावर त्याने टीका केली होती. शाहरुख म्हणाला होता की, “मला भारतात खूप भीती वाटते” त्याच्या या वक्तव्यावर पाकिस्तानी हाफिज सय्यदने त्याला पाठिंबा दिला होता.

 

त्याने शाहरुखला पाकिस्तानमध्येच स्थायिक होण्यास आमंत्रण देखील दिलं होतं. मात्र माध्यमांवर आलेल्या बातम्यांनी तेव्हा हाफिज सय्यदच्या या वक्तव्यावर शाहरुखने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याने मौन बाळगणे पसंत केले होते.

 

अशात आता या सर्वांमध्ये बाकीच्या दोन्ही खान बरोबरचे म्हणजे सलमान खान आणि आमिर खान बरोबरचे त्याचे वाद तुम्हाला माहीतच असतील. शाहरुखने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि इरफान खान यांची देखील एका अवॉर्ड फंक्शनमध्ये खिल्ली उडवली होती. आता सध्या त्याच्या मुलाच्या आयुष्यात सुरू असलेल्या अडचणी त्याने केलेल्या काही वाईट वाईट कामांच फळ आहे. असं अनेक दिग्गज व्यक्ती सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button