आत्ताच्या घडामोडी

21 वर्षे सोबत राहिले मात्र शाहरुख आणि अजयने एकाही चित्रपटात काम केले नाही; कारण वाचून धक्काच बसेल

दिल्ली | बॉलिवूडचा किंग खान आणि काजोल या दोघांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात हिट जोडी समजली जाते. चित्रपटात फक्त ही जोडी आहे असं समजताच तिकीट बारीवर गर्दी उफाळून येते. काजोल आणि शाहरुख या दोघांनी डीडीएलजे, कभी खुशी कभी गम, कूछ कूछ होता है असे अनेक हिट चित्रपट एकत्र केले आहेत.

 

पडद्यावर सर्वांनीच त्यांची केमेस्ट्री, मैत्री आणि प्रेम पाहिलं आहे. पडद्यामागे देखील हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. अनेक इव्हेंट, कार्यक्रम यात बऱ्याचदा हे दोघे एकत्र पाहायला मिळालेत.

 

अशात एकीकडे ही जोडी खूप गाजत असली तरी देखील आश्चर्याची एक बाब म्हणजे काजोलचा पती अजय देवगण आणि शाहरुख खान या दोघांचं पटत नाही. आधी या दोघांमध्ये मैत्री होती मात्र नंतर एका गोष्टीमुळे त्यांच्या मैत्रीत फूट पडली. त्यामुळे या दोघांनी कधीच एक मेकांबरोबर स्क्रीन शेअर केली नाही. या बातमीतून याचंच कारण जाणून घेणार आहोत.

 

साल १९९५ रोजी राकेश रोशन करण अर्जुन या चित्रपटाच्या तयारीत होते. यासाठी ते दोन उत्तम कलाकारांच्या शोधत होते. सुरुवातीला त्यांनी सनी देओल आणि अजय देवगण या दोघांची निवड केली होती.

 

मात्र सनी देओलने नंतर या साठी नकार दिला. त्याचं खरं कारण काही समजलं नाही. मात्र त्याला इतर काही चित्रपट असल्याने त्याने हा चित्रपट सोडला असावा असं म्हटलं जातं. त्यामुळे राकेश यांनी सनीच्या जागी शाहरुख खानची निवड केली.

 

आता करण अर्जुन या चित्रपटात राकेश यांनी सनीच्या जागी शाहरुख खानची निवड केली होती. त्यानंतर अजय देवगण आणि शाहरुख या दोघांना चित्रपटाची कहाणी ऐकवण्यात आली. त्यावेळी अजयला जे पात्र साकरायचे होते ते त्याने या आधी अनेक चित्रपटांमध्ये साकारले होते.

 

त्यामुळे त्याची अशी इच्छा होती की, शाहरुखला दिलेलं पात्र मला द्यावं आणि मला दिलेले पात्र शाहरुखला द्यावं. मात्र दिग्दर्शकांना हे मान्य नव्हतं. नंतर यावर चर्चा करण्यासाठी अजय देवगन आणि शाहरुख खान दोघे एकमेकांना भेटले होते.

 

यावेळी त्यांनी असे ठरवले की, दोघांनीही एकत्र या चित्रपटाला नकार द्यायचा. ठरल्याप्रमाणे अजयने चित्रपटास नकार कळवला. मात्र काही दिवसांनी अजयला समजले की, शाहरुखने या चित्रपटासाठी नकार कळवकेला नाही. तो अजूनही यात काम करत आहे. त्यामुळे अजयला शाहरुखचा खूप राग आला. आणि पुढे याच कारणावरून या दोघांमधील वादाची ठिणगी पेटली.

 

अशात २०१२ हे साल या दोघांच्या भांडणातील आगीत तेल ओतनारे ठरले. कारण याच वर्षी अजयचा ‘सन ऑफ सरदार’ आणि शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. यावेळी अजयने शाहरुखवर जास्त पैसे देऊन शो विकत घेतल्याचा आरोप केला होता.

 

शाहरुख आणि अजय या दोघांमध्ये अद्यापही शीतयुद्ध कायम आहे. काजोल या दोघांची ही चांगली मैत्री असून ती देखील या दोघांमधील वाद मिटवून शकलेली नाही. आणि मुळातच तिने दोघांना मैत्री करण्यासाठी कधी जबरदस्ती देखील केली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button