आत्ताच्या घडामोडी

१० वर्षापासून खूप वेदना सहन केल्या, सारा तेंडुलकरचां धक्कादायक खुलासा

मुंबई | भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या लाईम लाईटमध्ये खूप झळकताना दिसते. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते.

 

नुकतंच तिने मॉडेलिंगच्या दुनियेत पदार्पण केलं आहे. स्टार कीड असल्याने अनेक जण तिचं कौतुक करत आहेत. अशात काही दिवसांपूर्वी तिचे मॉडेलिंगचे काही फोटो व्हायरल झाले होते.

 

यामध्ये ती अतिशय सोजवळ आणि सुंदर दिसत होती. या नंतर तिची फॅन फॉलोइंग लिस्ट देखील झपाट्याने वाढली. तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये दिसते आहे.

 

अशात आता साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. जो सध्या मोठा व्हायरल तर होतं आहे सोबतच अनेक जण तिच्या जिद्दीला सलाम देखील करत आहेत.

 

प्रत्येक मुलगी आपल्या स्किनची खूप काळजी घेते. आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटत. मात्र ही सुंदरता साराच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी नव्हती. याची माहिती तिने स्वतः दिली आहे.

 

इंस्टाग्रामवर तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर एक डाग दिसतो आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ” १० वर्षांपासून कॉनस्टंट ठेवल्यामुळे माझी त्वचा बरी झाली आहे आणि आज ती बदलली आहे.”

 

साराच्या या कॅप्शन वरून लक्षात येते की, ती गेल्या अनेक दिवसांपासून स्किन साठीची ट्रीटमेंट घेत होती. ज्याचा तिला मोठा त्रास देखील सहन करावा लागतं असेल.

 

मात्र आता तिच्या चेहऱ्यावर तो डाग दिसत नाही. ती आता अतिशय सुंदर आणि क्यूट दिसते आहे. नुकतीच ती IPL २०२२ च्या सामन्यात मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देताना स्टेडियममध्ये दिसली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button