आत्ताच्या घडामोडी

अभिनेत्री संस्कृती बालगुडे प्रेमात झाली वेडी, हटके फोटो शेअर करत म्हणाली ‘हम आपके हैं कोण’

मुंबई | अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांचे वेगवेगळ्या पोस्टमधून मनोरंजन करत असते. अशात अभिनेत्रीने नुकतेच तिच्या एका फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सध्या खूप चर्चेत आहेत.

 

संस्कृतीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंट, लाईक आणि हार्ट ईमोजीचा वर्षाव केला आहे. तसेच तिचे हे फोटो तिच्या हटके कॅप्शनमुळे खूप चर्चेत आले आहेत.

 

संसृती नावाप्रमाणेच दिसायला फार सुंदर आहे. तिने लाल रंगाचा एक ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे. यामध्ये ती आणखीनच आकर्षक दिसते.

 

यावेळी तिने लाल रंगाचा एक मोठा वनपीस परिधान केला आहे. यावर सोनेरी रंगाची बारीक नक्षी देखील आहे. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानात हिरव्या रंगाचे मोत्यांचे दागिने घातले आहेत. केसांचा सुंदर असा बन घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

 

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. यातील प्रत्येक फोटोवर तिने हटके कॅप्शन दिलं आहे. आणि सर्वांमध्ये “हम आपके है कौन” असं लिहिलं आहे.

 

तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोला तिने ख्वाबो मे तुम आते हो क्यों… हम आपके… आपके है कौन….?” तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिला आहे की, ” हे होशू गूम, पूछो न तुम…..हम आपके… आपके है कौन….?” त्याचरोबर तिसऱ्या फोटोला तिने ” ये शर्म की, सूर्खी कहे हम आपके… आपके है कौन….?”

 

तिच्या या अनोख्या कॅप्शनमुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. हे कॅप्शन तिने कुणासाठी लिहिलं आहे? ती प्रेमात आहे का? तिला झालं तरी काय? असे प्रश्न चाहते तिला विचारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button