सनी देओलची पत्नी दिसते खूप सुंदर, करते ‘हे’ काम

दिल्ली | अभिनेता सनी देओल हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल आता ६५ वर्षांचा झाला आहे. सनी देओलने अलीकडेच सिनेसृष्टीशिवाय राजकीय करिअरला सुरुवात केली. चित्रपटांव्यतिरिक्त सनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतो.
‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सनी देओलची पत्नी पूजा अनेक वर्षांनी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. अशा परिस्थितीत सनीची पत्नी लाइमलाइटपासून दूर का राहते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या बातमीमधून या मागील कारण जाणून घेऊ.
सनीचा पहिला चित्रपट ‘बेताब’ होता, ज्यामध्ये त्याच्यासोबत अमृता सिंहने काम केले होते. दोघांच्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट हिट ठरला. शूटिंगदरम्यान अमृता सनीच्या प्रेमात पडली. या चित्रपटात दोघांचे काही इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले. त्यावेळी असे इंटिमेट सीन्स शूट करणं ही मोठी गोष्ट होती. ही दृश्ये पडद्यावर चित्रित केल्याने खऱ्या आयुष्यातही दोघांमधील जवळीक वाढू लागली.
एका वृत्तानुसार अमृता सिंगची आई सनी आणि त्यांच्या नात्याच्या विरोधात होती. रिपोर्टनुसार, अमृताच्या आईने सनी देओलच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली. यानंतर जे काही समोर आले ते जाणून ती थक्क झाली. सनी देओल लंडनमधील पूजा नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे अमृताच्या आईला समजले. एवढेच नाही तर सनीने पूजासोबत इंग्लंडमध्ये लग्न केले आहे. हे देखील समजले.
एकीकडे सनीचे संपूर्ण सत्य अमृताच्या समोर आले होते. दुसरीकडे, पूजाला पतीच्या अफेअरबद्दल काहीच कल्पना नव्हती. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, देओल कुटुंब सनी देओलचे लग्न गुप्त ठेवू इच्छित होते. कारण त्याची कारकीर्द नुकतीच सुरू झाली होती. त्यावेळी एखाद्या अभिनेत्याचे लग्न झाले की त्याची कारकीर्द संपली असे मानले जायचे.
त्यामुळे पूजा लंडनमध्ये राहत होती आणि सनी तिला भेटण्यासाठी दर महिन्याला लंडनला जात असे. सनी आपल्या लग्नाला सतत नकार देत होता. मात्र तोपर्यंत सनी आणि अमृताचे नाते पूर्णपणे संपले होते. सनी देओल आणि पूजा देओल १९८४ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. दोघांना करण देओल आणि राजवीर देओल ही दोन मुले आहेत.
पूजा ही पूर्णतः भारतीय नसून तिचे वडील भारतीय व आई ब्रिटिश होत्या. त्यामुळे ती दोन्हीही संस्कृतींमध्ये वाढली होती. तिला देखील कॅमेऱ्यापासून नेहमीच दूर राहायला आवडते. ती एक लेखिका आहे. जट यमला पगला दिवाना या चित्रपटामध्ये ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिती दिली होती. या चित्रपटाच्या सिक्वेल्सचे लेखन देखील पूजानेच केले आहे.