सलमान खानने कतरीना कैफला जेव्हा लगावली कानशिलीत….

दिल्ली | बॉलिवूडचा भाईजान म्हणून अभिनेता सलमान खान याला ओळखलं जातं. त्याने त्याच्या आयुष्यात बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि आजही देत आहे. सलमान नेहमीच त्याच्या अभिनयासह त्याच्या लव लाईफमुळे देखील चर्चेत राहिला आहे. बॉलिवूडमधील अनेक बड्या अभिनेत्रींबरोबर त्याचे प्रेम संबंध राहिले आहेत. मात्र आता पर्यंत असलेल्या नात्यांपैकी एकही नातं सलमानला टिकवता आलेलं नाही.

 

अगदी ऐश्वर्या राय पासून ते कॅटरीना कैफ पर्यंत अनेक अभिनेत्री सलमानच्या प्रेमात होत्या. सलमान देखील या अभिनेत्रींवर प्रेम करत होता. मात्र आधी पासूनच तापट डोक्याचा असल्याने त्याने सर्व मुलींना त्रास दिलेला आहे.

 

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन बरोबर जेव्हा तो रिलेशनशिपमध्ये होता. त्यावेळी त्या दोघांची जोडी चाहत्यांना देखील खूप आवडायची. त्यामुळे सर्वत्र या दोघांचं लग्न देखील होईल अशी चर्चा रंगली होती. मात्र तसं काही झालं नाही. अनेक मीडिया रिपोर्ट नुसार सलमान ऐश्वर्याबरोबर गैव्यवहार करायचा. ज्याचा तिला खूप त्रास होत होता. त्यामुळे ऐश्वर्याने स्वतः त्याला सोडून दिलं. त्यानंतर तिने अभिषेक बच्चन बरोबर विवाह केला.

 

सलमानच नाव कॅटरीना कैफबरोबर देखील जोडलेलं होतं. अनेक चाहत्यांना वाटत होतं की हा निदान हे नातं तरी टिकावेल. अशात टायगर जिंदा है या चित्रपटावेळी तर या दोघांच्या ल्हस्टोरीची खूप चर्चा रंगली होती.

 

पण स्वभावाला औषध नाही असं म्हणतात ते खरंच आहे. कारण सलमानने पुढे एवढ्या सुंदर कॅटरीनाला देखील खूप त्रास
दिला. एक दिवस तर चक्क त्याने तिला कानशिलात लगावली होती. या प्रकारामुळे ती खूप चिधली त्यामुळं कॅटरीनाने देखील सलमान खानला सोडून दिले.

 

काही दिवसांपूर्वीच कॅटरीनाने अभिनेता विकी कौशल बरोबर विवाह केला. या दोघांच्या लग्नाच्या बातमीने अनेक रसिक प्रेक्षक हादरले होते. अशात आता दोघेही आपल्या सुखी संसारात मग्न आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button