आत्ताच्या घडामोडी

56व्या वर्षी सलमान खानने उरकलं लग्न? या अभिनेत्री सोबत घेतले सातफेरे

Fact Check | बॉलिवूड अभिनेता सलमान खान तुम्हाला माहीत असेल, त्याचे भारत देशच नाहीतर संपूर्ण जगात चाहता वर्ग आहे. त्याचे करोडो चाहते आहेत. त्याने आत्तापर्यंत 100हून अधिक चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

 

सध्या त्याचे वय 56 वर्ष आहे. मात्र त्याने अद्याप लग्न केले नाही. त्याने अनेक अभिनेत्रींसोबत डेट केले आहे. मात्र आत्तापर्यंत कुठल्याही अभिनेत्री सोबत लग्न केले नाही. मात्र सध्या त्याच्या लग्नाची चर्चा होऊ लागली आहे.

 

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यात सोनाक्षी सिन्हा सोबत त्याने लग्न गाठ बांधल्याचे दिसत आहे. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सलमान ने लग्नाचा अवतार धारण केला आहे. तसेच सोनाक्षी देखील नटून थटून बसली आहे.

 

तसेच तिने सिन्दुर देखील लावला आहे. त्यामुळे सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाने एकमेकांसोबत विवाह केल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

 

सलमान खान सोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. तसेच सोनाक्षी सिन्हा देखील काही काळापासून तिच्या लग्नाच्या विषयासाठी चर्चेत येताना पहायला मिळत आहे. आणि सध्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्याने या दोघांच्या लग्नाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

 

मात्र व्हायरल होत असलेले फोटो खोटे आहेत. हे फोटो एडिट केलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सलमान खान याने सोनाक्षी सोबत विवाह केला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेले फोटो खोटे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button