‘या’ अभिनेत्रीने सलमान खानला सुनावले खडे बोल; तो वारंवार तिच्या जवळ जायचा अन्….

मुंबई | बॉलिवूडचा भाईजान हा नेहमीच त्याच्या लवस्टोरी मुळे चर्चेत राहिला आहे. अशात काही दिवसांपूर्वी त्याला मारण्याची धमकी आली होती. या धमकी वरून एक गोष्ट आठवली. ती म्हणजे अभिनेत्री भाग्यश्रीने सलमानची घेतलेली हजेरी. भाग्यश्री सलमानला चांगलीच ओरडली होती. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ…

 

अभिनेता सलमान खान हा अजूनही सिंगल आहे. आता पर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक सुंदर अभिनेत्री येऊन गेल्या. पण सलमान खान बरोबर एकीने सुद्धा लग्न केलं नाही. सलमान जेव्हा सिनेसृष्टीत नवीन होता तेव्हाच त्याने भाग्यश्रीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ती देखील बॉलिवूडमध्ये नवीन होती.

 

तसेच दोघेही पहिल्यांदाच एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करत होते. चित्रपटाचं नाव होतं मैने प्यार किया. नव्वदच्या दशकातला हा चित्रपट त्या काळी भलताच गाजला होता. या चित्रपटात दोघांची मैत्री आणि प्रेम दाखवण्यात आले आहे. सलमान खान हा अभिनय खऱ्या आयुष्यात सुरू आहे असं समजून बसला आणि त्याला भाग्यश्री आवडू लागली.

 

चित्रपटातील “दिलं दिवाना…..” या गाण्याच्या शुटींगवेळी सलमान सतत भाग्यश्री जवळ जात होता आणि तिच्या कानात हे गाणं गुणगणत होता. याचा अभिनेत्रीला खूप राग आला. सलमानच असं वागणं तिला आवडलं नाही त्यामुळे तिनें त्याला तिथेच झिडकारलं आणि आपल्यापासून दूर केलं. ती त्याला म्हणाली की, “लांब हो माझ्या पासून, अजिबात माझ्या जवळ यायचं नाही.”

 

हा सर्व प्रकार आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान पुन्हा एकदा समोर येणार होता. कारण यावेळी सलमान सूत्रसंचालन करत होता. तेव्हा त्याने या चित्रपटाचा उल्लेख केला होता. तो म्हणाला की, “मैने प्यार किया या चित्रपटानंतर भाग्यश्रीने माझ्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

 

कारण तिचे लग्न ठरले होते. त्यामुळे पुढचे सहा महिने मला कोणताच चित्रपट मिळाला नाही. माझ्या हातात कोणतेच काम नव्हते.” हे सर्व सांगत असताना सलमान खानच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.

 

सिद्धू मुसेवला नंतर सलमान खानला देखील धमकीचे फोन येत होते. त्याच्या घराबाहेर काही शूटर देखील येऊन गेल्याची माहिती समोर आली होती. या वेळी मुंबई पोलिसांची त्याला खूप साथ मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button