‘सैराट’ चित्रपटातील लंगड्या रुग्णालयात दाखल; ‘या’ गंभीर आजाराशी देत आहे झुंज

सोलापूर | सैराट या चित्रपटाने मराठी सिने विश्वात मोठा इतिहास रचला. आजही या चित्रपटाची प्रसिद्धी तितकीच कायम आहे. आजही अनेक जण हा चित्रपट आवडीने पाहतात. 2016 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

 

चित्रपटात नागराज मंजुळे यांचे प्रभावी दिग्दर्शन दिसले. तसेच आर्ची, परश्या, लंगड्या आणि सलीम या चौघांचा धडाकेबाज अभिनय देखील पाहायला मिळाला. रिंकू आणि आकाश ठोसर म्हणजेच आर्ची आणि परश्या या दोघांची लव स्टोरी चा त्यांना खूप आवडली.

Advertisement

 

मात्र या लव्ह स्टोरी ची खरी सुरुवात झाली होती ती लंगड्यामुळे. चित्रपटात लंगड्याने परशाला आर्चीला तू आवडत आहेस असं सांगितलं होतं. अशात तळागाळातील या अभिनेत्यांने लंगड्या हे पात्र उत्तम साकारले. लंगड्या हे पात्र अभिनेता तानाजी गालगुंडे यांनी साकारले होते. सध्या तो एका मोठ्या आजाराची झुंज देत आहे.

Advertisement

 

काही दिवसांपूर्वी तानाजीच्या पोटात दुखू लागले. सुरुवातीला त्याने औषध उपचार घेतला. मात्र त्रास अधिक होत असल्याने त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोलापुरातील सिविल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर रमय्या ठाकूर हे त्याच्यावर सध्या उपचार करत आहेत.

 

तसेच सध्या त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या देखील केल्या जात आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषध उपचार घेतल्याने तो लवकरच नक्कीच बरा होईल. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याचे चाहते आता मोठे चिंतेत आहेत. अनेक जण सोशल मीडिया मार्फत त्याची विचारपूस करत आहेत. तसेच काही चाहते त्याला लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करत आहेत.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *