‘सैराट’ मधील मंग्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी पाहिलीत का? दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

सोलापूर | सैराट चित्रपट प्रसिध्द झाला आणि गावातील छोटे कलाकार एक स्टार म्हणून फिरायला लागले. करमाळा तालुक्यात या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तालुक्यातील अनेक कलाकार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाले असतील.
चित्रपटातील सर्वच पात्रे हे प्रेक्षकांना फार भावली होती. मुख्यत आर्ची आणि परशा हे पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेलं. गरीब घरातील मुलावर श्रीमंत घरातील मुलगी प्रेम करते. त्यानंतर ते दोघे पळून जातात. आणि यात दोघांचे किती हाल होतात.
असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अत्यंत डोक्यावर उचलून घेतलं. मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक पैसे कमविनारा चित्रपट म्हणजे सैराट आहे. या चित्रपटाने १०० कोटी हून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
या चित्रपटाने अभिनय क्षेत्राला अनेक कलाकार दिले आहेत. यात रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गलगुंडे या सारखे दिग्गज कलाकार हे सैराट मधून खऱ्या नावा रूपाला आले. आजही त्यांचा अभिनय क्षेत्रात प्रवास चांगला सुरू आहे.
सैराट चित्रपटात आर्ची च्या मामाच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता तुम्हाला आवडत असेल. सुरुवातीला तो अर्चीला विरोध करायचा आणि त्यानंतर शेवटाला तो त्यांना पाठिंबा देत होता. असे या चित्रपटात त्याची स्टोरी आहे. आज आपण सैराट चित्रपटातील मंग्या विषयी जाणून घेणार आहोत.
मंग्या हा मूळचा करमाळा तालुक्यातील जेऊर गावचा आहे. त्याचं खरं नाव हे धनंजय ननावरे असे आहे. काही दिवसांपूर्वी तो एका किराणा मॉल मध्ये काम करताना दिसला. सध्या तो बोलेरो पिकअप चालवत आहे. तो सैराट नंतर अभिनय क्षेत्रात झळकला नाही.
संधी असून देखील तो का झळकला नाही? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच मुख्य कारण देखील कोणाला माहित नाही. सैराट मधील मंग्याचे लग्न झाले आहे. त्याला एक मुलगी आहे. तसेच त्याची पत्नी देखील फार सुंदर दिसते. त्याने त्याच्या पत्नी सोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.
त्याच्या पत्नीला तो लाडाने सोना या नावाने हाक मारतो. त्या दोघांचा अनेक वर्षापासून सुखी संसार आहे. धनंजय याची पत्नी एक गृहिणी आहे. यांचा छोटा परिवार आहे. ते एकमेकांसोबत खुश आहेत.