अभिनेत्री साई पल्लवी करणार लग्न; चाहत्यांना देणार खुशखबर

दिल्ली | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री साई पल्लवी ही तिच्या सिंपल आणि सोजवळ लूकने अनेकांना घायाळ करते. त्यामुळे महाराष्ट्रातील देखील लाखो तरुणांची ती क्रॅश बनली आहे. मात्र आता तिच्या मागे वेडे असल्या अनेक प्रेमींना ४४० वॉल्टचा करंट बसण्याची शक्यता आहे. कारण लवकरच ही अभिनेत्री विवाह करणार आहे.

 

साई पल्लवीच्या कुटुंबियातील व्यक्तींनी तिचं आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी ते उत्तम मुलाच्या शोधात आहेत. साई पल्लवीचं वैद्यकीय क्षेत्रातून पदवीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. अभिनयाची आवड असल्यानं तिने पुढे हे क्षेत्र निवडलं.

 

मीडिया रिपोर्ट नुसार तिच्या वीरता पर्वम या आगामी चित्रपटानंतर ती विवाहित झालेली असेल. अभिनेत्रीने साल २००५ पासून मोठ्या पडद्यावर अभिनयाची जादू करायला सुरुवात केली. ‘कस्तुरी मन’ हा तिचा पहिला चित्रपट होता.

 

या चित्रपटानंतर ‘धामधूम’, ‘प्रेमम’, ‘काली’, ‘फिदा’ अशा अनेक चित्रपटांमधून तिने रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर साल २०१८ मध्ये आलेला ‘मारी २’ या चित्रपटात ती झळकली.

 

‘मारी २’ या चित्रपटाने तिला एक वेगळीच प्रसिद्धी मिळवून दिली. अभिनयातील तिच्या करिअरला कलाटणी देणारा हा चित्रपट आहे. या मध्ये तिने आनंदी हे पात्र साकारलं होतं.

 

आपल्या दमदार अभिनयाने तिने आतापर्यंत ६ पुरस्कारांवर आपलं नाव कोरला आहे. यामध्ये साउथ फिल्म फेअर अवॉर्ड, CPC अवॉर्ड, बेस्ट फिमेल देब्यु या सारखे पुरस्कार तिला मिळाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button