आत्ताच्या घडामोडी

Fact Check | अभिनेते सचिन पिळगावकर यांचं खरंच निधन झाले आहे का? वाचा व्हायरल मेसेज मागील सत्य

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अशात काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होती.

 

ही पोस्ट अशा पद्धतीने बनवली गेली होती त्यामुळे खरोखरच सचिन पिळगावकर यांचे निधन झाले आहे असं वाटत होते. एका युजरने सचिन यांचा असा ब्लॅक अँड व्हाईट रंगातला फोटो पोस्ट केला होता. तसेच त्यावर सचिन यांचे निधन झालं असल्याचा मजकूर देखील लिहिला होता.

 

या पोस्टवर अनेकांच्या वेगवेगळ्या कमेंट येत होत्या. अनेक जण रडण्याचे ईमोजी शेअर करत होते. तर काहींनी भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली होती. ही पोस्ट कशा पद्धतीने बनवली गेली होती की, चाहत्यांना खरंच असं काही झालं आहे का याचा शोध घ्यायला भाग पाडले गेले.

 

त्यामुळे अनेकांनी सचिन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील कमेंट केल्या. आपल्याच विषयी अशा कमेंट वाचून सचिन हादरून गेले. त्यानंतर ते माध्यमांवर खूपच चिढले.

 

असे काही झाले नसून मी सुदृढ आणि व्यवस्थित आहे असं त्यांनी सोशल मीडिया मार्फत सर्वांना सांगितलं. सचिन पिळगावकर यांच्या निधनाची ही बातमी सपशेल खोटी होती. कोणीतरी मुद्दामून त्यांच्याविषयी एवढी निंदनीय अफवा पसरवली होती.

 

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत सचिन पिळगावकर यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे. सचिन बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. हा माझा मार्ग वेगळा या चित्रपटात ते पहिल्यांदा बाल कलाकाराच्या भूमिकेत झळकले होते. त्यानंतर त्यांनी ब्रह्मचारी, चंदा और बिजली, मेला या चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली.

 

नव्वदच्या दशकात दरोडेखोरांना धडा शिकवणाऱ्या शोले या चित्रपटात देखील त्यांनी दमदार अभिनय केला होता. गीत गाता चल, बालिका बहू, त्रिशूल, कॉलेज गर्ल, क्रोधी, सत्ते पे सत्ता, अवतार असे अनेक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले आहेत.

 

त्यांनी मराठी सिनेसृष्टी देखील कमालीची गाजवली. अशोक सराफ यांच्याबरोबर सचिन यांची जोडी खूप गाजली. १९८८ मध्ये आलेला चित्रपट अशी ही बनवाबनवी त्याकाळी खूप गाजला. या चित्रपटात सचिन यांनी लग्न झालेल्या महिलेचा रोल देखील केला होता. यामध्ये सचिन एखाद्या मुलीला लाजवतील एवढे सुंदर दिसत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button