आत्ताच्या घडामोडी

सैराट मधील परशा त्याच्या लाडक्या आर्चीला ‘या’ नावाने मारतो हाक

मुंबई | रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोन्ही कलाकार सैराट या चित्रपटाने खूप प्रसिद्धी झोतात आले. अगदी रातोरात या दोन्ही कलाकारांच आयुष्यच बदलून गेलं. अशात आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळजवळ ७ ते ८ वर्षांचा काळ लोटला आहे.

 

मात्र तरी देखील प्रेक्षक आजही या चित्रपटाचे आधीसारखेच दिवाणे आहेत. अशात रिंकू आणि आकाश हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेतं. सैराट नंतर या दोघांच्या प्रेम कहाणीची देखील चर्चा रंगली होती.

 

“मात्र हे सर्व खोटं असून मी अजूनही सिंगल आहे”, असं रिंकूने त्यावेळी स्पष्ट केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा ही जोडी आकाशाच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये आकाश एवढ्या दिवसांपासून लाडाने रिंकूला नेमकी काय म्हणून हाक मारतो हे समजले आहे.

 

त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर या दोघांच्या चर्चेला उधाण आलं आहे. कारण परशा आर्चीला रिंकू किंवा आर्ची म्हणून नाही तर एका वेगळ्याच आणि अनोख्या नावाने हाक मारतो. रिंकू आणि आकाश या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. या दोघांची मैत्री अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे.

 

पण आकाश त्याच्या लाडक्या मैत्रिणीला नेमकं काय म्हणून हाक मारतो हे अद्याप कुणालाही माहीत नव्हतं. आकाशने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून आज याचा खुलासा केला आहे. आणि त्याने त्याच्या लाडक्या मैत्रिणीला तिच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा देताना तिचं नाव त्याला आवडतं तसं घेतलं आहे.

 

रिंकू लवकरच तिच्या आगामी आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आकाश देखील तिच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आणि तिला शुभेच्छा देत आहे.

 

त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमधून तिला शुभेच्छा देत लिहिलं आहे की, ” बेस्ट विशेष राजगुरू” यावरून तो आपल्या लाडक्या मैत्रिणीला राजगुरू अशी हाक मारतो हे समजलं आहे. रिंकू आणि आकाश हे दोन्ही कलाकार आज अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमवत आहेत.

 

दोघेही मराठी, हिंदी चित्रपट तसेच वेब सिरीज मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. झुंड या चित्रपटात आकाशने चांगली कामगिरी केली. यामध्ये त्याच्या अभिनयाला चांगली दाद मिळाली. रिंकुने देखील यामध्ये अभिनय केला. तसेच कागर आणि मेकअप अशा चित्रपटांतून ती आणखीन प्रसिद्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button