आत्ताच्या घडामोडी

धक्कादायक! आर्चीचा भयानक अपघात? चेहरा पाहून चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई | अभिनेत्री रिंकू राजगुरुचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो पाहून थोडी भीतीचं वाटत आहे. कारण रिंकूचा चेहरा विद्रूप झाला आहे. यामध्ये तिचा चेहरा खूप भाजलेला दिसत आहे. तर आता या फोटोमागे काय सत्य दडल आहे हेच या बातमीतून जाणून घेणार आहोत.

 

अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’ या चित्रपटात चांगलीच कामगिरी केली. या नंतर नुकतीच ती आपल्याला ‘झुंड’ या चित्रपटात देखील दिसली. तर आता रिंकूचा भाजलेला चेहरा हा तिच्या आगामी चित्रपटातला लूक आहे.

 

‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. यासाठी तिने हा मेकअप केला आहे. या चित्रपटाची कथा ही प्रेम, स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार यांवर आधारित आहे.

 

या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. रिंकू यामध्ये एक ॲसिड हल्ला झालेली विक्टिम आहे. आपल्या न्यायासाठीची तिची लढाई यामध्ये पाहायला मिळणार आहे.

 

रिंकूचा भाजलेल्या चेहऱ्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक चाहते चिंतेत पडले आहेत. अनेकांना वाटले की, रिंकूला खोरोखर काही तरी झाले आहे. मात्र ती सुदृढ असून हा तिच्या आगामी चित्रपटासाठीचा लूक आहे.

 

‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटात तिच्या बरोबर विशाल आनंद हा नवोदित कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच दिग्गज कलाकार मकरंद देशपांडे देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.

 

या सिनेमाची कथा, दिग्दर्शन हे खुशबू सिन्हा यांचे असून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. समीर कर्णिक यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तसेच कुणाल गांजावाला, सोनू निगम, आदर्श शिंदे, शाहिद मल्ल्या, साक्षी होळकर यांची सुमधुर गाणी या चित्रपटाला लाभली आहेत.

 

अशात आता रिंकूचा हा लूक पाहून प्रेक्षकांची हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कारण हा चित्रपट आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाचे शुटींग पूर्ण झाले असून १७ जून २०२२ रोजी हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button