आत्ताच्या घडामोडी

असा आहे आर्चीचा जीवनप्रवास; वाचा माहीत नसलेल्या गोष्टी

मुंबई | मराठीत सांगितलेलं कळतं नाय, इंग्लिश मधी सांगू… आर्चीच्या या एका डायलॉगने सैराट चित्रपट चांगलाच गाजला. अशात आज ३ जून आर्ची म्हणजेच रिंकू रजगुरुचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आणि सैराट पर्यंतची तिची मेहनत जाणून घेऊ.

 

रिंकू राजगुरू ही मराठी सिनेविश्वातील एक अशी अभिनेत्री बनली आहे जिची विशेष अशी ओळख सांगण्याची गरज नाही. रिंकूने सैराट नंतरही आपल्या अभिनयाच्या वाटचालीला थांबवले नाही. रिंकूने आता पर्यंत अनेक वेब सिरीजमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

 

मात्र अजूनही तिला तिच्या पहिल्या चित्रपटासाठीचं ओळखलं जातं. रिंकूचा जन्म ३ जून २००१ रोजी अकलूज येथे झाला. तिचं बालपण आणि शालेय शिक्षण देखील तिथेच पार पडलं. अशात साल २०१६ मध्ये ती पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली.

 

रींकुला आधीपासूनच अभिनायची आवड होती. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटानं तिचं आयुष्यच बदलून गेलं. नागराज मंजुळे यांना सैराट या चित्रपटासाठी गावाकडची आणि बिनधास्त अशी मुलगी आर्ची हे पात्र साकारण्यासाठी पाहिजे होती.

 

त्यासाठी नागराज अनेक ठिकाणी गावो गावी जाऊन ऑडिशन घेत होते. अशात एकदा ऑडिशनमध्ये रिंकू देखील आली होती. नागराज यांनी तिची देखील ऑडिशन घेतली. रींकुचा अंदाज तिचा स्वभाव त्यांना आर्ची हे पात्र साकारण्यासाठी अगदी योग्य वाटला. मग काय लगेचच त्यांनी तिची या चित्रपटासाठी निवड केली.

 

अशात रिंकूने या चित्रपटातील सर्वच डायलॉग खूप छान पद्धतीने मांडले. अय कुठं चालला साबण लावून तोंडाला…., आणि तिचं कॉलेजमधील इंट्रोडक्शन या सर्वांनी तिने प्रेक्षकांना खल्ल्यास केलं होतं.

 

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रिंकूला अनेक पुरस्कार देखील मिळाले. रिंकू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अशात आपल्या चाहत्यांबरोबर ती अनेक फोटो शेअर करते. चाहते आज ही तिला रिंकू नाही तर आर्ची म्हणूनच तिच्यावर प्रेम करतात.

 

रींकुने या चित्रपटानंतर कागर, मेकअप, विराम न दिलेला, झुंड अशा अनेक चित्रपटांत काम केलं. लवकरच ती आठव रंग प्रेमाचा आणि चुमंतर या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

अशात आज तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियावरून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता ती २० वर्षांची झाली आहे. अनेक जण तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देखील देत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button