आत्ताच्या घडामोडी

आर्ची करतेय ‘या’ अभिनेत्यावर जीवापाड प्रेम? अनेकवेळा डेट आणि बरचं काही….

पुणे | सैराट चित्रपट आला आणि अकलूज सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या रिंकू राजगुरूचे पूर्ण आयुष्यचं बदलून गेलं, आई वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यामुळे भविष्यात शिक्षण क्षेत्रात नशीब आजमावनारी आर्ची अभिनय क्षेत्रातील सर्वात लोकप्रीय अभिनेत्री बनली.

 

सैराट चित्रपटात तिने आर्ची या पात्राची भूमिका साकारली आहे. रसिकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यानंतर रिंकू चाहत्यांच्या मनात बसत गेली, तिने सैराट नंतर कागर, झुंड या सारख्या दिग्गज चित्रपटांमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली.

 

रिंकू सध्याची सर्वात लोकप्रीय अभिनेत्रीपैकी एक आहे. दिवसेंदिवस तिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. रिंकू जेवढी तिच्या अभिनयाने आणि चित्रपटाने चर्चेत असते. त्याहून जास्त ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्याचे देखील अनेकदा आपण पाहिले असेल.

 

रिंकू राजगुरू एका मराठमोळ्या अभिनेत्या सोबत डेट करत असल्याच्या बातम्या अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तिच्या सोशल मीडिया वरील काही हरकतींमुळे देखील चाहत्यांच्या संशायमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

 

तो मराठमोळा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तिच्या सोबत सैराट चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता आकाश ठोसर आहे. त्याने सैराट मध्ये परशा या पात्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर आकाश आणि रिंकू हे दोन्ही कलाकार एका उंच शिखरावर जाऊन पोहचले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी रींकूने आकाश ठोसर सोबत फोटो टाकून डिनर – डेट असे Caption दिले होते. तिने एक इंस्टाग्राम स्टोरी टाकली होती. त्यामुळे रिंकू आकाश ला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत दोघांपैकी कोणीही अधिकृत सांगितलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button