जिला आपण समजत होतो साधीसुधी अभिनेत्री; ती निघाली रीमा यांची मुलगी

दिल्ली | मिळेल ती भूमिका साकारून बॉलिवूडला रडविनारी अभिनेत्री म्हणजे रीमा लागू, त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या, त्यांना मुख्यत आई या पात्राची भूमिका देण्यात येत होती. रीमा यांनी मेहणीतीवर अफलातून यश मिळविले आहे.

 

प्रत्येक चित्रपटात त्यांना आई या पात्राची भूमिका देत असायचे, ती भूमिका यशस्वी पार पाडून बॉलिवूड त्यांनी अनेक वेळा गाजविले आहे. त्यांना अभिनय क्षेत्रात नाव कमविण्यासाठी अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागला.

 

त्यानंतर त्या एका उंच शिखरावर जाऊन पोहचल्या आहेत. आज त्यांची पुण्यतिथी आहे. 2017 साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती.

 

रीमा यांचं अभिनय क्षेत्राला मोठं योगदान असल्याचं सांगितलं जाते. आज आपण त्यांच्या खासगी आयुष्यातील काही माहिती पाहणार आहोत. रीमा या आपल्यात नसल्या तरी त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते.

 

रीमा यांची मुलगी अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. ती देखील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. तिचे नाव मृण्ययी लागू असे आहे. हॅलो जिंदगी या चित्रपटाने ती प्रकाश झोतात आली.

 

त्यानंतर मराठी मधील दोघात तिसरा आता सगळं विसरा, या चित्रपटाने देखील तिला एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर तिने बायको, सातच्या आत घरात, मुक्काम पोस्ट लंडन अशा दिग्गज चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

 

आई प्रमाणे मृण्ययी अभिनय क्षेत्रात हुशार आहे. ती फक्त कलाकार नाही तर ती डायरेक्टर असिस्टंट म्हणून देखील प्रचलित आहे. तिने थ्री इडियट, जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button