भल्या – भल्या अभिनेत्रींना लाजवेल अशी आहे रविना टंडनची मुलगी; करतेय ‘हे’ काम

दिल्ली | “तू चीज बडी है मस्त मस्त…” आणि ” टीप टीप बरसा पाणी…” या गाण्यांनी आणि त्यातील नृत्याने रविना टंडनने अनेक तरुणांच्या हृदयाचा ठोकाच चुकवला. नव्वच्या दशक्तील ही अभिनेत्री आजही सोशल मीडियावर सक्रिय आहे.

 

तिच्या सुंदरतेने तिने त्यावेळी अनेकांच्या मनावर राज्य केलं अशात तिची मुलगी राशा ही देखील दिसायला काही कमी सुंदर नाही. बॉलिवूडमधील सर्व स्टार किड्सच नाही तर मोठं मोठ्या सुंदर अभिनेत्रींना देखील तिने आपल्या सुंदरतेचे मागे टाकलं आहे.

 

वयाच्या २१ व्या वर्षी रविनाने दोन मुलींना दत्तक देतल होतं. या दोघींची नावं पूजा आणि छाया अशी आहेत. दत्तक घेताना या दोन्ही मुली ११ आणि ८ वर्षांच्या होत्या. त्यानंतर रविनाने २००४ मध्ये अनिल थडानी बरोबर लग्न केलं. नंतर तिने रशा आणि रनबिर वर्धन या दोन मुलांना जन्म दिला.

 

तिने दत्तक घेतलेल्या मुली वयात आल्यानंतर रविणाने मोठ्या थाटात दोघींची लग्न लावून दिली. अशात आता अनिल बरोबर लग्न झाल्यावर तिने आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचे ठरवले होते. त्यावेळी तिने बॉलिवूडमधून काढता पाय घेतला. मात्र kgf २ मध्ये तिने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री केली.

 

सध्या रविनाची मुलगी राशा चांगलीच प्रसिद्धी झोतात आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचं वय फक्त १७ वर्षे एवढंच आहे. मात्र तरी देखील तिची प्रसिद्धी फार मोठी आहे. ती अभ्यासात देखील खूप हुशार आहे.

 

आणि अभ्यासाप्रमाणेच तिला संगीताची देखील आवड आहे. तिने कराटेचे देखील शिक्षण घेतले आहे. तसेच ती आपल्या सोशल मीडिया आपल्या सुंदर फोटोंसह गाणी आणि कराटेचे काही व्हिडिओ देखील शेअर करत असते.

 

रविना टंडन प्रमाणेच ती देखील बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि नॅशनल क्रश ठरू शकते असं अनेक जण म्हणतात. रविनाने सुरवातीच्या कारकीर्दीत बॉलिवूडसह दक्षिणात्य सिनेसृष्टी देखील चांगलीच गाजवली होती.

 

तिने साऊथमध्ये देखील अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग साऊथमध्ये देखील आहे. अशात तिच्या सुंदरतेचे त्याकाळी आणि आता देखील बॉलिवूडचा बाहुबली म्हणजेच अभिनेता प्रभास तिच्यावर फिदा होता. तो आजही सांगतो की, त्याचं पहिलं प्रेम रविना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button