राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलविनारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विषयी जाणून घ्या!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांनी विजय मिळवून, राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, शरद पवार हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार होते. मात्र अगदी शेवटच्या काही दिवसात त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.
त्याच वेळी शरद पवार व त्यांच्या परिवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या माढा मतदारसंघातून भाजपच्या वतीने रणजीतसिंह नाईकनिंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती, तर राष्ट्रवादीच्या वतीने संजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र रणजीतसिंह नाईकनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांना पराभवाची धूळ चारण्यात यश मिळवले. यामुळे शरद पवारांना चांगलाच धक्का बसला होता.
रणजितसिंह नाईकनिंबाळकर शिवसेनेचे माजी खासदार, हिंदुराव नाईकनिंबाळकर यांचे सुपुत्र असून, फलटणचे राष्ट्रवादीचे माजी मंत्री, राम राजे नाईकlनिंबाळकर यांचे ते कट्टर विरोधक आहेत. रंजीतसिंह व त्यांचे वडील हिंदुराव नाईकनिंबाळकर हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, तसेच पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक म्हणून परिचित होते. मात्र २०१९ पर्यंत दोघे ही पितापुत्र काँग्रेसमध्ये होते. त्यांची काँग्रेस पक्षावर निष्ठा होती. तसेच ते पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक होते.
त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण यांनी रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद दिले होते. त्याचबरोबर सातारा जिल्हा काँग्रेस व जिल्हाध्यक्ष म्हणून ही त्यांची निवड केली होती. या काळात माढा लोकसभा मतदारसंघात स्वराज्य दूध संघ व साखर कारखान्याच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्या पर्यंत त्यांनी पोहोचण्यात यश मिळवले होते. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपच्या वतीने त्यांनी माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूक लढवून यश संपादन केले होते.