आत्ताच्या घडामोडी

अरेच्चा! राखी सावंत झाली प्रेग्नेंट; बेबी बंप दाखवत म्हणाली….

दिल्ली | बॉलिवूड मधील राखी सावंत ही एक अशी अतरंगी अभिनेत्री आहे जी कधी काय करेल याचा काहीच नेम नसतो. तिची बातमी आली की, आता काय केलं हिने? असा प्रश्न आपसूकच सगळ्यांच्या मनात येतो. तर आता राखीने कोणत वाईट काम केलेलं नाही. तिने आता एक असं वक्तव्य केलं आहे जे ऐकून तुम्हाला हसावं की, रडाव असा प्रश्न नक्कीच पडेल.

 

सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतं आहे. यामध्ये राखी प्रेग्नेंट दिसते आहे. व्हिडीओमध्ये ती बेबी बंप दाखवत आहे. तर राखी आता खरच प्रेग्नेंट आहे का आणि एवढ्या लवकर तिला एव्हढ मोठ पोट कसं काय आलं. तर आम्ही तुम्हाला या बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

 

मंडळी राखी नेहमीच अतरंगी कारनामे करते. अशात आता ती एका जिम मधून तिच्या मित्रा बरोबर बाहेर आली आहे. तिला पाहून सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले आहेत. राखीने यामध्ये आपल्या पोटावर दोन मोठे फुगे बांधले आहेत आणि ते टॉपच्या आतमध्ये लपवले आहेत.

 

यात तिला पाहून सगळे बोलतात ती प्रेग्नेंट आहेत का? तर ती बोलते हो मी प्रेग्नेंट आहे. मी आता दोन मुलांना जन्म देणार आहे. माझी मुलं या जगात चाललेला भ्रष्टाचार, चोरी आणि सर्व गुन्ह्यांचा पर्दाफाश करणार आहेत. मी एका मासिहाला एका पैगंबरला जन्म देणार आहे.

 

पुढे ती म्हणते की मी बाहुबलीला जन्म देणार आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून आता सर्व जण हसत आहेत. तसेच पाहिलं तर आपल्या देशात अस कोणीतरी जन्माला येणं खरचं गरजेचं आहे. मात्र ते मूल रखीच असेल का? तुम्हाला या बद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button