VIDEO – नि:शब्द! क्षणभर नजर चुकली, अन् ५ वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या कुशीत सोडला प्राण; घटना CCTV मध्ये कैद

पुणे | काळ कधी कसा कुणावर झडप घरलेल याचा काही नेम नाही. लहान मुलांना डोळ्यात तेल घालून सांभाळावे लागते. कारण त्यांना चूक बरोबर याचा कोणताच अंदाज नसतो. त्यांना वाटेल तिथे ते खेळतात, बागडतात.
अशात आई नेहमीच आपल्या बाळाला काय बरोबर काय चूक, इकडे जायचं नाही, कुणी दिलेलं काही खायचं नाही अशा अनेक गोष्टी सांगत असते. मात्र आपल्या बाळाला कितीही समजवले काही केले तरी नियतीच्या हातात जे आहे ते घडणारच असते.
पिंपरी चिंचवड येथील एका महिलेवर एक मोठा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. यामध्ये त्या महिलेला तिच्या बाळापासून मुकावे लागले आहे. बाळाचा मृत्यू झाल्याने महिला आणि तिचे सर्व कुटुंब तसेच पिंपरी चिंचवड परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे.
दिनांक ५ जुलै रोजी मिसेस दौंडकर या पिंपरी चिंचवड येथील गीता स्टील फाब्रिकेशन जवळ असलेल्या वॉशिंग सेंटरमध्ये आपली दुचाकी गाडी घेऊन आल्या होत्या. गाडी वॉशिंग साठी देऊन जवळ असलेल्या खुर्चीवर त्या आपल्या ५ वर्षीय मुलाबरोबर म्हणजेच युवान बरोबर बसल्या होत्या.
त्यावेळी युवान तिथेच खेळत होता. दुकानाबाहेर एका लोखंडी खांबावर बॉबिंग करण्याचे मशीन ठेवले होते. खेळत खेळत तो लहान मुलगा त्या मशीन जवळ गेला आणि तिथे झोका घेऊ लागला. यावेळी ते मशीन त्याच्या तोंडावर पडले. मशीनचे वजन जवळपास २० ते ३० किलो एव्हढे होते.
अवघ्या पाच वर्षांच्या युवानवर ते मशीन पडल्याने त्याच्या तोंडाला जबर मार लागला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. हा सर्व प्रकार एवढा पटकन घडला की त्याच्या आईला काही समजलेच नाही. मुलाला पाहून तिने पटकन त्याच्याकडे धाव घेतली आणि रुग्णालय गाठले. मात्र तिथे पोहाचाण्या आधीच त्या बाळाचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिथे असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात व्हिडिओ कैद झाला आहे. अशात दौंडकर कुटुंबीय त्या दुकानाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. मात्र व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्यात कुणाचीच काही चूक नाही. त्या बाळाचा जीव एका अपघातात गेला आहे.