आत्ताच्या घडामोडी

डोळ्यांनी घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीवर आलीय खुपचं वाईट वेळ? चित्रपटात काम मिळवण्यासाठी करावे लागतेय ‘हे’ काम

दिल्ली | चार वर्षांपूर्वी आपल्या डोळ्यांच्या बंदुकीने प्रिया प्रकाश वरियरने सर्वनांच घायाळ केलं होतं. अशात आता तिच्या नवीन फोटोशूटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये प्रिया खूप वेगळी दिसत आहेत.

 

फोटो पाहिल्यावर ही प्रियाच आहे असं पटकन समजून येत नाही. त्यामुळे या फोटोवरून ती चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक जण या साठी तिचं कौतुक करत आहेत. तर काही जण तिला ट्रोल देखील करत आहेत.

 

तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती आदिवासी लूकमध्ये दिसत आहे. अंगावर साधी साडी, कानात, गळ्यात आणि हातात आदिवासी परंपरेचे दागिने तिने घातले आहेत. या लुकमध्ये तिने उदास चेहाऱ्यासह फोटो काढला आहे.

 

तिच्या या फोटोवर अनेक चाहते तिला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. कारण प्रियाचा हा लूक चाहत्यांना तितका आवडलेला नाही. ती कोणत्या नवीन चित्रपटाच्या शुटींग साठी तयारी करत आहे का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत.

 

चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत ती म्हणाली आहे की, “हा माझा खरा लूक आहे.” चार वर्षांपूर्वी प्रियचा ‘ओरू आदर लव्ह’ या चित्रपटातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

 

या चित्रपटात तिने ‘माणिक्य मलाराया पूवी’ या गाण्यात डोळा मारण्याचा एक सीन दिला होता. ज्यामुळे चात्यांच्या मनात तिची ती प्रतिमा रेखाटली गेली. आजही अनेक जण तिला या चित्रपटातील पात्रा मुळेच ओळखतात.

 

प्रियाचे सोशल मीडियावर ७.१ मिलियन फॉलोवर्स आहेत. त्यातील तिने फक्त ९४ व्यक्तींना फॉलो केले आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत काही ना काही आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते.

 

‘माणिक्य मलाराया पूवी’ या गाण्यामुळे ती रातोरात स्टार झाली. सध्या ती २२ वर्षांची झाली आहे. आणि आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. ती केरळमधील विमला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. प्रियाला मॉडेलिंगची फार आवड आहे. तसेच तिला गाणी आणि डान्स देखील खूप आवडतो.

 

प्रिया लवकरच हिंदी चित्रपटात देखील झळकणार आहे. ‘श्रीदेवी बंगला’ हा तिचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचं शूटिंग देखील पूर्ण झालं आहे. यासह ती कन्नडमध्ये देखील डेब्यू करणार आहे. ‘विष्णू प्रिया’ या चित्रपटातून तिचा कन्नडमध्ये पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच देखील पोस्ट प्रोडक्शनच काम सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button