आत्ताच्या घडामोडी

शुटींग, इव्हेंट, योगा क्लास सगळीकडे शेपूट बरोबर आहे, प्राजक्ता माळीची ती पोस्ट झालिये तुफान व्हायरल

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळीची आता विशेष अशी ओळख करून देण्याची गरज नाहीये. कारण छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंतचा तिचा प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. नुकतीच प्राजक्ता तिच्या रानबाजार या वेब सिरीजमुळे खूप चर्चेत आली होती. अशात आता तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा एकदा तिची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

 

प्राजक्ताच्या घरी एक छोटीशी पाहुनी आली आहे. तिने या पाहुनीला ‘शेपूट’ असं नाव देखील दिलं आहे. तिच्या घरी तिची भाची आली आहे. त्यामुळे आपल्या भाची बरोबरचे अनेक गोड फोटो अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

 

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्राजक्ता तिच्या भाची बरोबर खूप मज्जा मस्ती करत आहे. एका फोटोमध्ये या दोघी स्विमिंग करत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहेत. मनोरंजन आणि बॉलिवूडच्या भाषेत सांगायचं झाल्यास बोले तो फूल टू आत्या गिरी.

 

अशात प्राजक्ताने हे फोटो शेअर करत खाली सुंदर असं कॅप्शन देखील लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे की, “उन्हाळ्याच्या सुट्टीत पोरं “मामाच्या गावाला” जातात; ही “आत्तूच्या शहरी” आलीए. (आजी आत्तूबरोबर एकटी दुबईला गेली होती म्हणून आजीला टूक टूक माकड करून ती आत्तूबरोबर एकटी मुंबईला आलीए घ्या… )”

 

पुढे आपल्या भाचीला तिने एक नाव देत लिहिलं आहे की, ” शुटींग, इव्हेंट, योगा क्लास सगळीकडे शेपूट बरोबर आहे…” प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चात्यांबरोबर फक्त मनोरंजन नाही तर खासगी आयुषयाबद्दल देखील अनेक गोष्टी शेअर करते.

 

अशात आता आत्या आणि भाचीचं हे प्रेम पाहून चाहते या दोघींचं फार कौतुक करत आहेत. प्राजक्ता लवकरच तिच्या ‘वाय’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button