आत्ताच्या घडामोडी

प्राजक्ता माळीचं अखेर ब्रेकअप; ‘या’ मुलावर करत होते जीवापाड प्रेम?

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी अजूनही तिच्या रान बाजार या सिरीज मुळे चर्चेचा विषय ठरते. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतीच तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे.

 

अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या रान बाजार सिरीज मुळे तर चर्चेत आहेच. पण आता तिच्या आगामी वाय या चित्रपटामुळे देखील ती चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली दिसते.

 

तिने नुकतीच एका वृत्तपत्राला या चित्रपटानिमित्त एक मुलाखत दिली. यावेळी तिने सर्वांना चकित करणारा एक मोठा खुलासा केला आहे. प्राजक्ता एवढी सुंदर आहे की, महाराष्ट्रातील लाखो तरुण तिच्या मागे वेडे आहेत.

 

पण ती ज्याच्यावर प्रेम करत होती अशा एका तरुणाने तिला नाकारलं आहे. होय तुम्ही बरोबर वाचताय. अभिनेत्रीने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. मुलाखतीत ती म्हणाली आहे की, ” मी वाय चित्रपटाचे शूटिंग करत होते. तेव्हाच माझा ब्रेकअप झाला.

 

यावेळी मी कुठे आहे? काय करते? हे मला काहीच समजत नव्हतं. दिग्दर्शक मला सांगायचे की, हा सीन शूट करताना तू इथे पडली होतीस, तू या सीन वेळी असं बोलली होतीस. हे तुला आठवत आहे का? त्यांनी असं विचारल्यावर मी त्यांना हो एवढंच बोलायचे. “

 

या सर्वांवरून प्राजक्ता ब्रेकअप मुळे किती खचली होती हे स्पष्ट समजत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर अनेक जण तिला सहानुभूती देताना दिसत आहेत. प्राजक्ताने तिच्या अभिनयाने ती एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे हे सिद्ध केलं आहे.

 

रान बाजार ही सिरीज याचं उत्तम उदाहरण आहे. आपल्या वाय या आगामी चित्रपटाबद्दल देखील ती मुलाखतीमध्ये म्हणाली की, ” हा एक सुपर थ्रिलर आणि हायपरलिंक चित्रपट आहे.

 

यामध्ये माझी खूप छोटी भूमिका आहे. पण मी दिग्दर्शकांची खूप आभारी आहे. त्यांनी एवढ्या सुंदर कहानिसाठी माझी देखील निवड केली. याचा मला आनंद आहे. मला अजून खूप आव्हानात्मक भूमिका साकारायच्या आहेत. ” असं देखील ती म्हणाली.

 

प्राजक्ता साल २००८ पासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तांदळा हा तिचा पहिला चित्रपट. यामध्ये तिने बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर खो खो, संघर्ष आणि चंद्रमुखी सारख्या अनेक चित्रपटांत ती झळकली.

 

मोठ्या पडद्यावर ती सुरुवातीला तितकीशी गाजली नाही. त्यामुळे तिने छोट्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची छटा उमटवली. तिने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत खूप छान पद्धतीने आपली भूमिका साकारली आहे. या मालिकेमुळेच तिच्या करिअरला मोठी कलाटणी मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button