आत्ताच्या घडामोडी

खुशखबर! प्राजक्ता माळी करणार लवकरच लग्न?

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज मनोरंजन विश्वातील स्वतः च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकांपासून ते चित्रपट सृष्टी आणि वेब सिरीज पर्यंत तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 

अशात सोशल मीडियावर तिच्या विषयी सतत काही ना काही चर्चा सुरू असतात. अनेकवेळा तिच्या कामगिरीने तिचं कौतुक होतं. तर बऱ्याचदा तिला ट्रोल देखील केलं जातं. सध्या अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती तिच्या अभिनयामुळे नाही तर लग्नामुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

 

प्राजक्ता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. त्यामुळे माध्यमांनी तिला या विषयी प्रश्न विचारले असता. तिने सांगितले आहे की, ” सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही. लग्न करावं असं मला आता तरी वाटत नाहीये. त्यामुळे मी अजून २ वर्षे तरी विवाह बंधनात अडकणार नाही.” असं तिचं म्हणणं आहे.

 

प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा तिच्या विषयी खूप वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होतं असतात. नुकतेच तिचे “प्राजक्त प्रभा,” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. आपल्या लेखनाची जादू तिने या दुस्ताकातून दाखवली आहे.

 

काही दिवसांपूर्वी तिने लग्न संस्थांवर एक वाग्रस्त पोस्ट लिहिली होती. यावेळी देखील तिला ट्रोलिंगचा सामना करवा लागला. तिच्या या पोस्टमध्ये तिने असं लिहिलं होतं की, ” प्रत्येकाने लव्ह मॅरेज केलं पाहिजे अरेंज मॅरेज नाही. अनेक लग्न संस्था या फक्त लोकांची लुबाडणूक करत असतात.”

 

प्राजक्ता माळी ८ ऑगस्ट १९८९ रोजी पंढरपूर शहरात जन्मली. सध्या ती ३१ वर्षांची झाली आहे. आजवर तिने मराठी सिनेसृष्टीला आपल्या अभिनयाने खूप मोठं केलं आहे. अशात पंढरपूर या शहराशी तिची नाळ लहानणापासूनच जोडली गेली आहे.

 

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत तिने मेघना हे पात्र साकरल होतं. या मालिकेतूनच ती प्रसिद्धी झोतात आली. यामध्ये ललित प्रभाकर आदित्यची भूमिका साकारत होता. मेघना आणि आदित्य ही जोडी त्यावेळी चांगलीच गाजली होती.

 

अशात अभिनेत्री नुकतीच तिच्या रान बाजार या वेब सिरीजमुळे चांगलीच ट्रोल झाली. लवकरच ती ‘वाय’ या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यामध्ये मुक्ता बर्वे ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button