आत्ताच्या घडामोडी

सिद्धू आणि केके यांच्या नंतर आणखी एका प्रसिध्द गायकाचे निधन; ५००हून अधिक गाण्यांना दिला होता आवाज

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी प्राणज्योत मावळत आहे. अनेकांचा कोणत्या न कोणत्या कारणावरून मृत्यू होत आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना असा प्रश्न पडला आहे.

 

अभिनय करणाऱ्या कलाकारांच्या बरोबर संगीत विश्वातील कलाकार देखील जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे धक्काच बसला आहे. लता मंगेशकर, बप्पी लहरी, केके, सिद्धू मुसेवाला या सारख्या दिग्गजांच्या निधनाने संगीत विश्व हादरलं आहे.

 

सिनेविश्वातील संगीत क्षेत्रासाठी एक मोठी दुःखद बातमी समोर येतं आहे. म्युझिकल हिप्पी हेअरचे को क्रिएटर जेम्स राडो यांचं सोमवारी निधन झालं आहे. वयाच्या नव्वदच्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

 

त्यांच्या क्रकिर्दित त्यांनी लेट द सनशाईन आणि एक्वेरियस सारखी हिट गाणी लिहिली आहेत. ते एक उत्तम संगीत लेखक होते. सुरण प्रमाणेच शब्दांची देखील त्यांना जाण होती. त्यांचे हे दोन्ही अल्बम खूप हिट ठरले होते. तसेच यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले होते.

 

त्याचं निधन हे त्यांच्या कुटुंबीयांसमोर झालं आहे. त्यांचे मित्र मार्ले फ्रीमार्क यांनी सांगितले की, हृदयाचे ठोके बंद होऊन त्यांचे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. मंगळवारी न्यूयॉर्क येथे त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

 

एका वृत्तपत्रातील बातमीनुसार खरं तर जेम्स राडो यांच्या करिअरची सुरुवात ही संगीत लेखन नाही तर अभिनयाने झाली होती. त्यांना अभिनयाची आवड असल्याने एका नाटकात त्यांनी रोजमेरी हॅरिस हे पात्र साकारले होते. इतकेच नाही तर क्रिस्टोफर वॉकन आणि माईक निकोलस यांच्या द नैक या चित्रपटात देखील त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी स्वतः च एक पुस्तक देखील लिहिलं होतं.

 

तसेच जेरोम राहणी यांच्या बरोबर एक गाणं देखील लिहिलं होतं. ६० च्या दशकात या दोघांनी नवीन संस्कृतीसह लैंगिक अत्याचारावर देखील एक गाणं लिहिलं होतं.

 

ब्रीफ ऑफ ब्रॉडवेरण नंतर हे गाणं १९६८ मध्ये पुन्हा एकदा खूप गाजलं होतं. त्यावेळी हे गण १७५० वेळा चाललं होतं. एका मुलाखतीत जेम्स यांनी सांगितलं होतं की, हीप्पीमध्ये स्वातंत्र्याची एक वेगळीच भावना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button