धक्कादायक! आधी सिद्धू, मग केके आणि आता दिग्गज गायकाचे निधन; 22व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दिल्ली | संगीत सृष्टीमधून काळीज सुन्न करणारी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिद्धू मुसेवाला आणि केके नंतर आता स्वतंत्र संगीतकार शील – सागरचे निधन झाले आहे. संगीत क्षेत्राने आधी दोन तेजस्वी तारे आपल्यातून गमावले होते. अशात आता शीलच्या निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

 

शील सागर हा दिल्लीचा राहणारा होता. तो एक स्वतंत्र गायक आणि गीतकार म्हणून ओळखला जायचा. तसेच त्याला विविध वाद्यांचे देखील ज्ञान होते. त्याचं ‘इ फ आय ट्राइड’ हे पहिलंच गाणं खूप गाजलं होतं. चाहत्यांनी त्याच्या या गाण्याला चांगलचं डोक्यावर घेतलं होतं.

 

आपल्या संगीताच्या कारकीर्दीत तो आणखीन मोठी आणि बहुचर्चित गाणी देऊ शकला असता. मात्र वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्याची प्राण ज्योत मालवली. अशात त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

 

शीलने गेल्याच वर्षी त्याची काही गाणी रिलीज केली होती. ज्यामध्ये ‘बिफोर इट गोज’, ‘मिस्टर मोबाईल मॅन – लाईव्ह’, ‘स्टील’ यासह अन्य तीन गाण्यांचा समावेश आहे. आपल्या गाण्यांनी खूप कमी वयातच तो चर्चेत आला होता. त्याचं ‘मिस्टर मोबाईल मॅन – लाईव्ह’ हे गाणं गुरुग्राममधील द पियानो मॅन जॅझ क्लबमध्ये लाईव्ह रेकॉर्ड केलं होतं.

 

अशात आता त्याचा मृत्यू हा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजले नसल्याने कलाविश्वात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच सलग ३ गायकांचा मृत्यू ही खरोखरच एक चिंताजनक बाब आहे. शीलचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. त्यामुळे अनेक जण ट्वीट करत अनेक प्रश्न विचारत आहेत.

 

अशात त्याच्या एका चाहत्याने ट्वीट करत लिहिले आहे की, “संगीतकारांसोबत काय होत आहे? आधी सिद्धू, मग केके आणि आता शील. शील हा डीयू म्युझिक सर्किटचा एक अप्रतिम गायक-गीतकार होता. RIP”

 

अशा प्रकारचे अनेक चिंताजनक ट्वीट सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. शीलच्या चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळी त्याला सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button