बॉलीवूड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्रीच्या पतीचे निधन; या आजाराने होते ग्रस्त

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. तसेच कलाकारांच्या डोक्यावरील मायेचं छत्र देखील हरवत आहे. अनेकांच्या जवळच्या नातेवाईकांनी जगाचा निरोप घेतला आहे.
त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आणखी एका दिग्गज अभिनेत्रीच्या डोक्यावरील छत्र हरवल्याने ती सध्या अत्यंत दुःखाचा सामना करत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिध्द अभिनेत्री मीना आहे.
गेल्या काही दिवसांपासून मीनाच्या पतीला फुफुसांचा संसर्ग झाला होता. दिवसेंदिवस तो संसर्ग वाढत गेला, त्यानतंर मीनाचे पती विद्यासागर यांना चेन्नई मधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा आली नाही.
अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यामुळे मीनावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे. मीना एक तमिळ आणि हिंदी कलाविश्वात काम करणारी अभिनेत्री आहे. तिच्या पतीच्या निधनाने ती पूर्णपणे खचून गेली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातारण बनले आहे.
मीना आणि विद्यासागर या दोघांना एक ११ वर्षाची मुलगी आहे. त्या मुलीचे नाव नैनिका असे आहे. २००९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर त्यांचा सुखाने संसार सुरू होता. मात्र अचानक झालेल्या निधनाने दुःखाचा डोंगर पसरला आहे.