आत्ताच्या घडामोडी

स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने वाचवले चिमुकल्याचे प्राण; पोलिस कॉन्स्टेबलचे मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक 

करोली | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. दररोज असंख्य फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फेसबुक आणि WhatsApp एका क्षणात फोटो व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 

एक पोलिस कॉन्स्टेबल एका चिमुकल्याला घेऊन आगीतून बाहेर काढत आहे. एका दुकानाला आग लागली होती, त्यात दोन महिला आणि नवजात बाळ होते. ते जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना स्वतः बाहेर येता येत नव्हतं.

 

सदर घटना पोलिस कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा यांना समजल्यावर त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या महिलांचा आणि चिमुकल्याचा जीव वाचवला आहे. त्यामुळे सदर पोलिस कॉन्स्टेबलचे पूर्ण देशात कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

 

ही घटना राजस्थान मधील करोली या ठिकाणी घडली आहे. एका बाईक रॅली वेळी हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. कॉन्स्टेबल शर्मा यांचे मुख्यमंत्र्यांनी फोन करून कौतुक केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button