बॉलीवूड हादरलं! आणखी एका प्रसिध्द गायकाचे निधन; अभिनय क्षेत्रात पुन्हा हळहळ

दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून मनोरंजन विश्वाशी निगडित अनेक व्यक्ती या जगाचा निरोप घेत आहेत. काही संगीतकार तर काही अभिनेते आणि काही अभिनेत्री आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत. अशात यामध्ये काहींचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. तर काहींनी आत्महत्या तर काहींची हत्या करण्यात आली आहे. अशात संगीत विश्वातील आणखी एका दिग्गज गायकाचा मृत्यू झाला आहे. पंजाब मधील कवी सुरेश शर्मा यांचे निधन झाले आहे.
त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. सुरेश शर्मा हे एक विनोदी कवी, अभिनेते तसेच लेखक होते. त्यांनी पंजाबी भाषेत अनेक गाणी आणि कविता लिहिल्या होत्या. आपल्या कविता ते विनोदी अंदाजात स्वतः च प्रेक्षकांसमोर सादर करायचे.
अशात आता त्याचे निधन झाले असून त्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे त्यांचे चाहते अधिक चिंतेत आहेत. त्यांच्या मृत्यूच गूढ अद्याप अस्पष्ट असल्याने अनेक जण याच कारण शोधण्याची धडपड करत आहेत.
मनोरंजन विश्वात दररोज कोणत्या ना कोणत्या कलाकारावर काळाचा आघात होताना दिसतो आहे. अशात मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख ही देखील नुकतीच मोठ्या दुःखातून सावरली आहे. साल २०२० मध्ये तिच्या पतीचे म्हणजेच आशुतोष भाकरे याचे निधन झाले होते.
आपल्या पतीच्या निधनामुळे ती खूप खचून गेली होती. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याने सात जन्माची गाठ बांधली तो एक जन्मही तिची साथ देऊ शकला नाही. साल २०१६ मध्ये त्या दोघांचा विवाह झाला होता. त्यानंतर ४ वर्षांतच या दोघांचा सुखी संसार मोडला. अभिनेत्री आता हळूहळू या दुखःतून सावरत आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. गिरीश ओक यांच्या आईचे देखील वृद्धापकाळाने निधन झाले. आई म्हणजे सगळ्यात मोठा आधार असतो. आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी आई बरोबर असली की, सहज सोडवता येतात. मात्र आईचे छत्र गिरीश यांच्या पासून दूर गेले. त्यामुळे ते खूप खचले होते. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या आईच्या निधनाची पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या आईला श्रद्धांजली वाहिली होती.
अशात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबर चित्रपटांत धमाल करणारे जेष्ठ अभिनेते राजेंद्र कडकोळ यांचे देखील गेल्या वर्षी निधन झाले. त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक चित्रपटांत काम केले होते. त्यांना नेहमी सहायक कलाकाराच्या भूमिकेत पाहिलं गेलं होतं. यासह जेष्ठ अभिनेते विरा साथीदार यांनी देखील या जगाचा निरोप घेतला आहे.
मराठीतल्या अजय अतुल प्रमाणे बॉलीवूडची नदीम श्रावण ही जोडी देखील संगीत विश्वातील प्रसिद्ध जोडी होती. मात्र ही जोडी देखील तुटली आहे. याच्यातील श्रावण या गायकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे या गायकाचा मृत्यू झाला होता. साल २०२१ मध्ये अनेक हिरे हरपले आहेत.
यामध्ये आधी दिलीप कुमार यांचे एका आजाराने निधन झाले. नंतर कर्क रोगाशी झुंज देत असताना ऋषी कपूर आपल्याला कायमचे सोडून गेले. इरफान खान सारखा हरहुन्नरी अभिनेत्री देखील आपल्यातून निघून गेला. तर गानकोकिळा म्हणून संगीत विश्वावर राज्य करणाऱ्या लता दीदी यांची देखील प्राण ज्योत मालवली.