आत्ताच्या घडामोडी

निलेश साबळेची पत्नी दिसते फारच सुंदर; करतेय ‘हे’ काम?

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार निलेश साबळे प्रत्येकाला माहीत आहे. त्याच्या विषयी काही माहिती जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांना कायम उत्सुकता असते. त्याचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे.

 

चला हवा येऊद्या या रिॲलिटी शो मधून निलेश साबळे घराघरात पोहोचला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश साबळे याचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी आत्तापर्यंत फू बाई फू, चला हवा येऊद्या, लाव रे तो व्हिडिओ या शो मध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली आहे.

 

तसेच त्याने नवरा माझा भवरा, दुभंग या चित्रपटात भूमिका साकारली आहे. मात्र त्याला चित्रपटाने प्रसिद्धी मिळाली नाही. त्याला खरी पसंती चला हवा येऊद्या या कार्यक्रमाने मिळाली असल्याचे सांगितले जाते.

 

निलेश साबळे आणि त्याची पत्नी गौरी साबळे सोशल मीडियावर ऍक्टिव नसतात. त्यामुळे त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना कायम असते. आज आम्ही तुम्हाला नीलेशच्या पत्नी बाबत काही माहिती सांगणार आहे.

 

निलेश साबळे आणि गौरी हे कॉलेज मध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यांनी विवाह करण्याचे ठरवलं आणि त्यांनी लग्न केलं.

 

आजपर्यंत त्यांचा सुखाचा संसार आहे. गौरी ही गृहिणी आहे. मात्र पुढील काळात एका मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button