आत्ताच्या घडामोडी

नेहा कक्करच्या पती बरोबर घडली मोठी दुर्घटना, पोलिसात केली तक्रार दाखल

दिल्ली | प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा पती रोहनप्रीत बरोबर एक दुर्घटना घडली आहे. यामध्ये त्याची संपत्ती काही अज्ञात इसमांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

 

नेह कक्करने आज संगीत विश्वात स्वतः च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अशात तिचा इथ पर्यंतचा प्रवास हा फार कठीण होता. मोठ्या मेहनतीने तिने संगीत विश्वात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशात एवढ्या प्रसिद्ध गायिकेचा पती बरोबर अशी घटना घडन खरोखरच निंदनीय आहे.

 

नेहा आणि तिचा पती काही दिवसांपूर्वी सिमांचल येथे फिरायला गेले होते. यावेळी नेहाने तेथील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नुकताच रोहनप्रीतचा वाढदिवस देखील साजरा झाला. वाढदिवानिमित्तच हे दोघे बाहेरगावी फिरायला गेले होते. इथेच त्यांच्या बरोबर ही दुर्घटना घडली.

 

रोहनप्रीत ज्या रूमवर राहिला होता तेथून त्याच्या काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या. ज्यामध्ये एक आयफोन, ॲपल वॉच आणि हिरांची एक अंगठी आहे. झालेल्या चोरी बद्दल त्याने नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. सध्या पोलीस या चोराचा शोध घेत आहेत.

 

नेहा आणि रोहनप्रीत ही जोडी अनेकांची फेवरेट जोडी आहे. रोहनप्रीतच्या वाढदिवशी अनेकांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छ दिल्या होत्या. अशात नेहाने देखील त्याच्या सेलिब्रेशनचे काही फोटो चाहत्यांनबरोबर शेअर केले होते. ती नेहमीच रोहनप्रीत बरोबरच्या अनेक गोष्टी सोशल मीडिया मार्फत चाहत्यांना सांगत असते.

 

अशात नेहा कक्कर ही सध्या एक आघाडीची अभिनेत्री आहे. पण सुरुवातीला ती काही जागरणाच्या कार्यक्रम गाणं गायची. ती ११ मध्ये असताना तिने इंडियन आयडॉलमध्ये सहभाग घेतला होता. मात्र त्यावेळी तिथे तिला अपयश आलं होतं. मात्र खचून न जाता तिने खूप मेहनत केली.

 

तिचं मिले हो तुम हमको हे गाणं खूप गाजलेलं आहे. अशाच प्रकारे तिने अनेक हिट अल्बम केले आहेत. अशात ज्या शोमध्ये तिला संधी मिळाली नव्हती त्या शोची जज होण्याचा मान देखील तिने पटकावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button