आत्ताच्या घडामोडी

मुलगा करोडपती पण अभिनेत्याच्या वडिलांना करावी लागतेय ड्राइव्हरची नोकरी

मुंबई | 2018 साली KGF हा चित्रपट आला आणि यश या नवीन अभिनेत्याचं आयुष्यच बदलून गेलं. Kgf या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्या अभिनयाने रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे.

 

नवीन कुमार गौडा हा अभिनेता सुरुवातील छोट्या पडद्यावर काम करायचा, हळू हळू तो मध्यम स्वरूपाच्या चित्रपटात अभिनय करू लागला. त्यात त्याला पाहिजे असं यश मिळालं नाही. त्याच्या आयुष्यातील स्टार बदलणार हे त्याला माहीत होत.

 

2018 साली KGF हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आला, आणि त्या चित्रपटाला लोकांनी चक्क डोक्यावर घेतलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळाला. आणि यामुळे नवीन कुमार गौडा हा सर्वत्र प्रचलित झाला.

 

सध्या तो चित्रपट करण्यासाठी करोडो रूपयांचे मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्याचे वडील काही हजार रुपयांसाठी नोकरी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक परिवहन महामंडळात त्याचे वडील ड्राइव्हर म्हणून नोकरी करतात.

 

मात्र मुलगा करोडपती असून देखील त्याच्या वडिलांना नोकरी का करावी लागत आहे? असा प्रश्न यशचे चाहते मोठ्या प्रमाणात विचारताना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते ड्राइव्हर ची नोकरी करतात.

 

त्यांना त्या नोकरीतून काही हजार रुपये भेटतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते सामान्य आयुष्य जगतात. तसेच ते ज्या घरात राहतात. त्या घराची स्थिती देखील हलाखीची आहे. यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय की, मुलगा करोडपती असून देखील बापावर ही वेळ का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button