आत्ताच्या घडामोडी

घटस्फोट झाला नाही, तरी नाना पाटेकर राहतात पत्नी पासून दूर, कारण ऐकून धक्काच बसेल

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतून जाऊन हिंदी चित्रपटात काम करून ते सिनेमा गाजविणारे अभिनेते म्हणून ओळख असणारे नाना पाटेकर सर्वांच्याच मनावर राज्य करून गेले आहेत. त्यांचे शेकडो चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करून गेले आहेत.

 

जुन्या काळातील अभिनेते म्हणून त्यांची ओळख, त्यांना चित्रपटात पोलिस किंवा अधिकारी या पात्राची भूमिका आपण अनेकदा पाहीली असेल. त्यांचे शेकडो चित्रपट आज देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

 

नाना पाटेकर हे सुरुवातीच्या काळात नाटकांमध्ये काम करत होते. त्यातून त्यांना थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांना मोठ्या चित्रपटात देखील काम मिळू लागले. आणि ते सुपरस्टार बनले.

 

तिरंगा, क्रांतिवीर, नटसम्राट, वेलकम, परींदा या चित्रपटांमधून त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटात नाना वेगवेगळ्या भूमिकेत रसिकांच्या भेटीला आले होते. त्यांचा नटसम्राट हा चित्रपट तर मराठी रसिकांनी डोक्यावर घेतला होता.

 

आज आम्ही तुम्हाला नाना पाटेकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहिती सांगणार आहे. नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांच्या सोबत राहत नाहीत.

 

नीलकांती आणि नाना यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव मल्हार पाटेकर असे आहे. नीलकांती आणि नाना पाटेकर यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. मात्र तरी देखील दोघे सोबत राहत नाहीत. त्यांच्यात वारंवार कौटुंबिक वाद होत असल्यामुळे ते सोबत राहत नसल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button