आत्ताच्या घडामोडी

वाईट बातमी! अभिनेता नकुल मेहताची प्रकृती खालावली; रुग्णालयात सुरू आहे शस्त्रक्रिया

मुंबई | हिंदी मालिकांमधील गाजलेली मालिका ‘बडे अच्छे लगते है २’ च्या प्रेक्षकांसाठी आणि अभिनेता नकुलच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. अभिनेता नकुल मेहताची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तो डॉक्टरांच्या निगरणीत आहे.

 

‘बडे अच्छे लागते है २’ या मालिकेत नकुल हा राम हे पात्र साकारतो. तब्येत अचानक बिघडल्याने त्याने मालिकेतील पुढील सर्व शूटिंग रद्द करत पुढे ढकलले आहेत. त्याला काही दिवसापासून अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे रुग्णालयात याच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

 

शस्त्रक्रियेनंतर आता तो रुग्णालयातच आहे. त्याला आरामाची सक्त गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. नकुलची तब्येत अशी अचानक डिघडल्यानं त्याचे चाहते सध्या चिंतेत आहेत. तसेच सोशल मीडिया मार्फत सर्व जण तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करत आहेत.

 

नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो आता मालिकेच्या शूटिंगसाठी पुन्हा केव्हा येईल याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. अशात या सर्वांचा परिणाम मालिकेवर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मालिकेतील पुढील भागात आता काही दिवस तरी राम हे पात्र पाहायला मिळणार नाही.

 

मालिकेमध्ये नकुल राम हे मुख्य पात्र साकारतो तसेच यामध्ये अभिनेत्री दिशा ही प्रिया हे पात्र साकारते. प्रिया आणि राम या दोघांची जोडी मालिकेच्या प्रेक्षकांना फार आवडते. सोशल मीडियावर सतत या दोघांच्या प्रेम कहाणीची चर्चा देखील सुरू असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button