दहावीत दोनवेळा झाले नापास, तरीही यशस्वी दिग्दर्शक; नागराज मंजुळे यांची थरारक कहाणी

सोलापूर | काल राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले त्याचप्रमाणे काही जण नापास देखील झाले. मात्र नापास झालो म्हणजे खूप काही मोठी चूक केली असं नसतं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी वेगवेगळे गुण असतात.

 

प्रत्येकाची आकलन क्षमता वेगळी असते. अशात अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. असं अनेक जण सांगतात. त्यामुळे आपल्या अपयशावर आपण स्वतः मात केली पाहिजे. त्यासाठी आपल्यातला आत्मविश्वास मजबूत असणे गरजेचे आहे.

 

आत्मविश्वास मजबूत असेल तर संपूर्ण जग जिंकता येत. दहावीच्या परीक्षेत अनेक जन नापास होतात. मात्र तरी देखील अशा अनेक व्यक्ती आहेत. ज्यांनी दहावीत नापास होऊन सुद्धा मोठ नाव कमावलं आहे. अनेक लोक त्यांना ओळखतात. त्यांचा आदर करतात. अशा अनेक व्यक्ती आपल्या देशात आहेत.

 

त्यापैकीच एक प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे. नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट सारखे मोठे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील त्याचं योगदान आज लाख मोलाचं बनल आहे.

 

अशात तुम्हाला माहित आहे का ? नागराज मंजुळे हे देखील दहावीत नापास झाले होते. ते ही एकदा नाही तर चक्क दोन वेळा. दोन वेळा परीक्षा देऊन देखील ते नापास झाले होते. त्यांनी आपल्या निकालाची माहिती स्वतः दिली आहे.

 

साल २०१५ मध्ये त्यांनी आपला दहावीचा निकाल स्वतः च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. यामध्ये त्यांना अवघे ३८.२५ टक्के मिळालेले आहेत. निकालात तुम्ही पाहू शकता की, त्यांना गणितात ३२ आणि इंग्रजीमध्ये फक्त ६ गुण मिळाले आहेत. मात्र इतर विषयात त्यांना चांगले मार्क आहेत.

 

नापास झालेल्या विद्यार्थ्याना धीर देण्यासाठी आणि त्यांनी खचून जाऊ नये म्हणून नागराज यांनी त्यांच्या निकालाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी यावर म्हटल आहे की, ” मी दहावीत दोनदा नापास झालो. अपयशामुळे सर्व काही संपते असे नाही. पहिल्याच प्रयत्नात पास झालो असतो तर पुढच्या वर्गात गेलो असतो, पण तसं झालं नाही.”

 

आपण नापास झालो आहोत याचं फार दुःख न करता ते पुढे म्हणाले की, ” कोणतेही, कितीही मोठे संकट येऊ दे; पण खचून जाऊ नका. मी दहावीत नापास झालो होतो. आज मी काय आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे. प्रत्येकाने आपल्या अंगी असलेल्या धाडसाला जागृत ठेवणे जास्त गरजेचे आहे.”

 

अनेक विद्यार्थी परीक्षेत अपयश आल्याने आपलं आयुष्य संपवतात. त्यांना सांगताना पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ” आयुष्य खूप मोठं आहे. त्याचे वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी सदैव तयार राहीले पाहीजे. त्यानंतर मार्ग आपोआप मिळत राहतो आणि यशही आपली साथ देते.

 

पास झालो म्हणजे खूप मोठा तीर मारला असं नसतं आणि नापास झालो म्हणजे आपल्यात काही खोट आहे, असंही नसतं. आनंदानं जगता येणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्याचा पास-नापास याच्याशी संबंध नसतो.” नागराज मंजुळे हे नेहमीच सत्य घटनांवर रेघोट्या ओढणारे चित्रपट काढत असतात. स्टार घडवणारे ते पहिलेच दिग्दर्शक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button