नागा चैतन पुन्हा एकदा पडला प्रेमात; समंथाला विसरून ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट

दिल्ली | समंथा रुतप्रभू आणि नागा चैतन ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात हिट जोडी होती. अगदी प्रेमापासून ते त्यांच्या घटस्फोटापर्यंत सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. अशात अभिनेता नागा चैतन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Join WhatsApp Group

 

मात्र आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण हे त्याचा घटस्फोट नसून प्रेम कहाणी आहे. आता तुम्हाला वाटेल की समंथा आणि नागा पुन्हा एकदा एकत्र येत आहेत की, काय मात्र तसं काहीच नाही. उलट घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही आपल्या आयुष्यात सुखी आहेत.

 

तर मग नागा पुन्हा एकदा लवलाईफमुळे कसकाय चर्चेत येतोय तर याच उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नागाचं नाव आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दुसऱ्या एका अभिनेत्रीबरोबर जोडलं जातं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे शोभीता धुलीपाला.

 

नागा आणि शोभिता हे दोघे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मेजर या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले होते. या चित्रपटानंतर या दोघांना अनेक वेळा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे.

 

हैद्राबाद येथील हॉटेलमध्ये देखील हे दिघे एकत्र दिसले होते. तसेच काही दिवसांपूर्वी नागाने या अभिनेत्रीला त्याच्या घरी नेलं होतं. तिथे या दोघांनी चांगला वेळ एकत्र घालवला. तसेच अभिनेत्याने तिची ओळख कुटुंबीयांना देखील करून दिली.

 

हळू हळू आता नागा मुवऑन होतं आहे. समंथा बरोबर घटस्फोट घेतल्यानंतर तो देखील खूप खचला होता. मात्र त्याने आपल्या करिअरवर जास्त फोकस करण्याचा निर्णय घेतला. समंथा देखील तिच्या करिअरकडे जास्त लक्ष देत आहे. अशात पुष्पा या चित्रपटातील आयटम साँगमुळे ती आणखीनच प्रसिद्ध झाली. सर्वांनी तिच्या अभिनयाचं आणि डान्सच खूप कौतुक केलं.

 

नागा हैद्राबाद येथे एक घर घेत आहे. सध्या त्याच्या या घराचं काम सुरू आहे. त्याने शोभिताला देखील त्याच हे घर दाखवलं आहे. दोघे एकमेकांबरोबर खूप खुश असतात. अनेकदा ते एकत्र वेळ घालवतात. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्या डेटची चर्चा रंगली आहे.

 

नागा चैतन नेहमीच सोशल मीडिया पासून दूर राहणे पसंत करतो. त्याला आपल्या खासगी आयष्याबद्दल जास्त सांगायला आवडत नाही. मात्र त्याची ही सर्व माहिती बॉलिवूड लाईफने चित्रित केली आहे.

 

लग्नाला चार वर्षे झाल्यावर ऑक्टोबर २०२१ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर दोघे आपल्या चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त झाले. नागा लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. लालासिंग चढ्ढा हा त्याचा आगमी चित्रपट आहे. तर समंथा आता शाकुंतलम आणि यशोदा या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button