मुक्ता बर्वेचा ‘वाय’ हा चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित; चाहत्यांची प्रतीक्षा संपली

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक मुक्ता बर्वेच्या “वाय” या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपणार आहे कारण मुक्तने या चित्रपटाचा टिजर व्हिडिओ शेअर करत त्याच्या प्रदर्शनाची तारीख देखील सांगितली आहे.

 

मुक्ताने शेअर केलेला टिजर व्हिडिओ खरोखरंच भयभीत करणारा आहे. “वाय” हा एक हायपरलिंक थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि आई कुठे काय करते या मालिकेत आशुतोषची भूमिका साकारणारा अभिनेता ओमकार गोवर्धन देखील मुख्य भूमिकेत आहेत.

 

मुक्ताने शेअर केलेल्या टिजरमध्ये लिहिलं आहे की, ” सत्य घटनांवर आधारित चित्रपट. वास्तवाचा हायपरलिंक थरार.” आणि मुक्ताने देखील कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ” मिळून साऱ्याजणी ‘ती’च्या पाठी की ‘ती’च्या सह? घेऊन येत आहे वास्तवाचा हायपरलिंक थरार ‘वाय’ २४ जूनपासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात.”

 

अभिनेत्रीने लिहिलं कॅप्शन वाचूनच अंगावर शहारे उभे राहत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये आता लवकरात लवकर चित्रपट पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

 

अशात मुक्ताने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा आणखीन एक टिजर व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला होता. ज्यामध्ये दिसत आहे की, ती झोपेतून जडी होते तेव्हा दबक्या पावलांनी एक मोठा कुत्रा तिच्या अंगावर झेप घेतो.

 

अशात तिने या टिजर व्हिडिओला असं कॅप्शन लिहिलं होतं की, ” आता झोप उडणार! आज तिची वेळ आणि उद्या कदाचित तुमची…! सावध रहा” या चित्रपटाचं दिग्दर्शन अजित सूर्यकांत वाडीकर यांनी केलं आहे.

 

ते असं म्हणतात की, ” हा चित्रपट वास्तवावर आधारित आहे. वाय या शीर्षकामागेच खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची आणि अस्तित्वासाठीची मोठी कहाणी आहे.” मुक्ता बर्वेने आता पर्यंत अनेक चित्रपट साकारले आहेत. अभिनयातील तिचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळेच चाहते देखील हा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button