मोहन जोशी यांची पत्नी पाहिलीत का? आहे प्रसिध्द अभिनेत्री

मुंबई | मोहन जोशी हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीतील कार्यरत आहे. आता सध्या ते मालिका विश्वात काम करतात. मोहन जोशी हे सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशच्या बाबांची भूमिका साकारत आहेत. आजवर त्यांनी आपल्या कारकीर्दीत ४५ नाटके, ३५ मराठी हिंदी भाषिक मालिका आणि ३४५ पेक्षा अधिक हिंदी तर २२० मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यांचा या यशा मागे त्यांच्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. मोहन जोशी यांच्या पत्नीचे नाव ज्योती जोशी असे आहे.

Join WhatsApp Group

 

ज्योती या देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्या एक निर्मात्या म्हणून काम करतात. या दोघांना दोन मुलं देखील आहेत. त्यांचा मोठा मुलगा नंदन हा अभियनयापासून खूप दूर आहे. तर जोशी यांच्या मुलीचे नाव गौरी आहे. रचना संसद आर्किटेक्टमध्ये त्याने इंटेरियर डिझायनरचे शिक्षण घेतले आहे. तर त्यांच मुलगी गौरी ही विवाहित असून बेंगलोर येथे तिच्या पती बरोबर राहते.

 

मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. पहिले नाटक ’टुणटुण नगरी खणखण राजा’ हे होते. नाटके करणे सुरू असताना ते बी.कॉम. झाले.

 

पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौऱ्यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापका जवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.

 

ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीसाठी मुंबईत आले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक होय. त्यापूर्वी त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते.

 

कॉमर्स कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती. नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वतःचा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.

 

घराबाहेर’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; राष्ट्रीय अभिनय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. तसेच ’तू तिथे मी’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार बे दुणे साडेचार’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट विनोदी अभितेता पुरस्कार मृत्युदंड’

 

 

हिंदीतील अभिनयासाठी स्क्रीन ॲवॉर्ड, फिमफेअर पुरस्कार ’रावसाहेब’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; स्क्रीन ॲवॉर्ड’सरीवर सरी’मधील अभिनयासाठी साहाय्यक अभिनेत्यासाठीचा मटा सन्मान ’सवत माझी लाडकी’तील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button